आयकर विभागाला 'ही' माहिती नाही दिली तर दहा लाखांचा दंड? आयटीआर भरताना करु नका 'ही' चूक!
देशात आयकर रिटर्न (आयटीआर) भरणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, अनेक राज्यांमध्ये महिलांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यामागची कारणे समोर आली आहेत. यामध्ये उत्तम कामाच्या संधी मिळणे, वाढलेला सहभाग, कामातील स्वातंत्र्य इ. गोष्टींमुळे महिलांना आर्थिक भरारी मिळत आहे.
‘हा’ आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करणार; लिस्टिंगच्या दिवशीच होऊ शकतो इतका प्रॉफिट!
महाराष्ट्राचा पहिला क्रमांक
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचा या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. 2023-24 च्या मूल्यांकन वर्षासाठी महाराष्ट्रातील महिलांनी सर्वाधिक रिटर्न भरले आहेत. या यादीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ५ वर्षांच्या बाबतीत तेलंगणा आघाडीवर आहे.
टाईम्स ऑफ इंडियानुसार, राज्यवार रिटर्न भरण्यात महाराष्ट्रातील महिला सर्वात पुढे होत्या. महाराष्ट्रातील 36.8 लाख महिलांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरले. गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील 22.5 लाख महिलांनी आयटीआर दाखल केला होता. तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. जिथून २०.४ लाख महिलांनी आयटीआर दाखल केला आहे.
संजय मल्होत्रा असणार रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला स्वीकारणार पदभार!
यूपीमध्ये प्रचंड वाढ
उत्तर प्रदेशातील महिला देखील गेल्या ५ वर्षांत रिटर्न भरण्यात पुढे आहेत. 2019-20 च्या मूल्यांकन वर्षात 15.8 लाख महिलांनी रिटर्न भरले होते. तर 2023-24 मध्ये ही संख्या 29 टक्क्यांनी वाढून 20.4 लाख झाली आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2023-24 च्या मूल्यांकन वर्षासाठी येथून 14.3 लाख महिलांनी रिटर्न भरले. हा आकडा 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2019-20 मधील 11.3 लाखांपेक्षा 26 टक्के अधिक आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, तेलंगणातील महिलांमध्ये 5 वर्षांमध्ये रिटर्न फाइलिंगमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 5 वर्षांत त्यात 39 टक्के वाढ झाली आहे. तर रिटर्न भरण्यात दिल्लीतील महिला खूप मागे आहेत. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी, देशाच्या राजधानीतील 12.08 लाख महिलांनी आयटीआर दाखल केला. गेल्या 5 वर्षात रिटर्न भरण्यात दिल्लीतील महिलांचा सहभाग केवळ 11 टक्क्यांनी वाढला आहे.