IndiGo ची साडेसाती काही संपेना! अनेक उड्डाणे रद्द; GST ने पाठवली तब्बल 'इतक्या' कोटींची नोटिस (फोटो-सोशल मीडिया)
IndiGo GST Notice: इंडिगो एअरलाइन्स गेल्या काही दिवसांपासून गंभीर अडचणींचा सामना करत आहे. या अडचणींच्या मालिकेत अजून एका अडचणीची भर पडली आहे. इंडिगो एअरलाइन्ससाठी अत्यंत वाईट बातमी असून कंपनीला जीएसटीकडून दंड आकारण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड) ला २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जीएसटी विभागाने ५८.७५ कोटी रुपयांची दंड ठोठावला असून त्याची नोटिस पाठवली आहे. हा आदेश दिल्ली दक्षिण आयुक्तालयाच्या सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्तांनी जारी केला असून त्यात दंडासह मूलभूत जीएसटी कराची देखील मागणी समाविष्ट करण्यात आली आहे.
या स्पष्टीकरण देताना इंडिगोने ही नोटीस चुकीची असल्याचे सांगितले असून यावर कायदेशीररित्या आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, हा आदेश चुकीचा असल्याचे इंडिगोने म्हटले आहे. त्यांच्याकडे त्याविरुद्ध जोरदार युक्तिवाद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या नोटीसचा त्यांच्या आर्थिक स्थितीवर, दैनंदिन कामकाजावर किंवा व्यावसायिक गोष्टींवर परिणाम होणार नसल्याचे सांगितले.
इंडिगो आधीच ऑपरेशनल आव्हानांना तोंड देत असतानाच जीएसटी विभागाकडून ही दंडाची नोटिस आली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेकदा उड्डाणे रद्द झाल्यामुळे, डीजीसीएने एअरलाइनला २०२५ च्या हिवाळी वेळापत्रकात १०% कपात करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे त्यांच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्याच वेळी, कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांना डीजीसीए समितीसमोर हजर राहण्याचे समन्स देखील बजावण्यात आले. या सगळ्यांचा परिणाम म्हणून, शुक्रवारी इंडिगोचा शेअर्स ०.५०% घसरून ४,८४५ वर व्यवहार करत आहे. गेल्या महिन्यात हा शेअर १६% पेक्षा जास्त घसरला होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप १.८७ लाख कोटी रुपये आहेत.
हेही वाचा : Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती
दरम्यान, ब्रोकरेज जेफरीजने इंडिगोच्या शेअर्ससाठी त्यांची लक्ष्य किंमत ६,०३५ रु. वर राखली आहे आणि त्यांना ‘बाय’ रेटिंग दिले आहे. अलिकडच्या काळात उद्भवलेल्या ऑपरेशनल अडचणी आणि वाढत्या खर्चामुळे नजीकच्या काळात नफ्यावर दबाव येऊ शकतो, परंतु एअरलाइनचा मजबूत बाजार हिस्सा आणि आंतरराष्ट्रीय विस्तार दीर्घकालीन आधार प्रदान करतो. मागील १५ दिवसांत इंडिगोचे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान झाले. इंडिगोचा भारतीय देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रावरही परिणाम झाला आहे, ज्याचा देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेत ६४ टक्क्यांहून अधिक वाटा आहे. अचानक झालेल्या ऑपरेशनल सिस्टम बिघाडामुळे देशभरातील विविध विमानतळांवर गोंधळ उडाला.






