Nashik Industrial Development: नाशिकचे होणार लवकरच औद्योगिकीकरण! उद्योगांना बळ देणारे चार 'मेगा प्रकल्प' होणार सुरू (photo-social media)
Nashik Industrial Development: नाशिक लवकरच औद्योगिक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येणार असून त्यासाठी वचनबद्ध असल्याचे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले आहे. यासाठी एम अँड एम प्रकल्प, सीपीआरआय लॅब, ड्राय पोर्ट आणि डिफेन्स इनोव्हेशन सेंटर हे विकासाचे महत्त्वाचे टप्पे नमूद केले. नाशिकच्या विकासांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (वायसीएमओयू) यश इन सभागृहात शिक्षण-कौशल्य समन्वय उपक्रमांतर्गत आयोजित निमा आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त बैठक झाली. या बैठकीत निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी या संबधित माहिती दिली. तसेच, या बैठकीत रोजगार क्षमता वाढवण्यावर आणि उद्योग-शिक्षण समन्वय मजबूत करण्यावर एकमताने भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती
या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन आणि इतर प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. कुलगुरू संजीव सोनवणे यांनी यावेळी बोलताना, अभ्यासक्रमात अधिक रोजगारावर केंद्रित करण्याची, तसेच उद्योग-विशिष्ट व्यावहारिकता आणि थेट उद्योग कार्यावर आधारित संशोधनावर भर देण्याची गरज आहे. कॅप्सूल अभ्यासक्रम, पुस्तिका, लिंक-आधारित शिक्षण साहित्य आणि ऑडिओ-व्हिज्युअल व्हिडिओ तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
तसेच, उद्योगाच्या नवीन गरजांवर आधारित अल्पकालीन प्रकल्प राबविण्याची विद्यापीठाने देखील तयारी दर्शवली. या बैठकीत पर्यावरण, जलसंवर्धन, स्वयंरोजगार आणि गोदावरी स्वच्छता मोहीम यावर देखील लक्षकेंद्रित करण्यात आले. लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल टपारिया यांनी ईव्ही तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देखील दिली.
हेही वाचा : RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात ‘इतक्या’ वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा
स्नेहल म्हापणकर यांनी मशरूम नर्सरी, कृषी प्रोटोटाइप यासारख्या स्वयंरोजगाराच्या संधी तसेच स्टार्टअप्स आणि इनक्युबेशन सेंटरद्वारे तरुणांना उपलब्ध असलेल्या संधींवर प्रकाश टाकला. नाशिकच्या समग्र आणि शाश्वत विकासासाठी उद्योग-शैक्षणिक सहकार्यासाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण ठरली. वाणिज्य आणि व्यवस्थापन शाळेचे संचालक प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी कौशल्य विकासासाठी अनेक सूचना दिल्या. त्यांनी क्यूआर कोड-आधारित प्रमाणपत्रे, ई-गॅरेज, अल्पकालीन आणि कॅप्सूल अभ्यासक्रम आणि सायबर सुरक्षा, आरोग्यसेवा आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रात नवीन अभ्यासक्रमांच्या विकासाची आवश्यकता अधोरेखित केली. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि स्टायपेंड मॉडेल देखील सुचवण्यात आले.






