फोटो सौजन्य: @siramitji1(X.com)
संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील अग्रणी कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड (पारस डिफेन्स) यांनी डीप टेक कंपनी लॉजिक फ्रूट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (लॉजिक फ्रूट) धोरणात्मक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सुमारे 8 टक्के हिस्सा रु.10 कोटींच्या मूल्याने संपादन केले आहे. एअरो इंडिया 2025 या जगातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शनात ही घोषणा करण्यात आली. या गुंतवणुकीच्या निमित्ताने देशी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने भारताची वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे.
लॉजिक फ्रूट ही डीप-टेक आणि संशोधनावर आधारित कंपनी असून, हाय परफॉरमन्स कम्प्युटिंग, एफपीजीए/एसओसीवर आधारित एम्बेडेड सोल्युशन्स आणि ॲडव्हान्स्ड सिग्नल प्रोसेसिंग यामध्ये विशेष प्रावीण्य आहे. संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासावर भर देत ही कंपनी एरोस्पेस, संरक्षण, दूरसंचार आणि सेमीकंडक्टर उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण मिशन-क्रिटिकल प्रणाली डिझाइन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
भारतातील केबल उद्योगात होतेय वाढ; करावा लागतोय ‘या’ आव्हानांचा सामना
या भागीदारीच्या माध्यमातून, पारस डिफेन्सला लॉजिक फ्रूटच्या हाय-स्पीड डेटा प्रोसेसिंग, एआय-ड्रिव्हन एम्बेडेड सोल्युशन्स आणि रिअल-टाइम कॉम्प्युटिंग आर्किटेक्चर्समधील तज्ज्ञता वापरून त्यांची उपकंपनी पारस अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या क्षमतांना अधिक बळकटी देता येईल. पुढील पिढीतील संरक्षण तंत्रज्ञानाच्या नवसंशोधनाला गती देणे तसेच हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सोल्युशन्सच्या प्रगत संशोधन आणि व्यावसायीकरणासाठी नवे मार्ग उघडणे हा या सहयोगाचा उद्देश आहे.
एअरो इंडिया 2025 दरम्यान बोलताना, पारस डिफेन्सचे व्यवस्थापकीय संचालक मुंजाल शरद शाह म्हणाले, “या गुंतवणुकीमुळे भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला अधिक बळकटी मिळाली आहे. लॉजिक फ्रूटची संशोधन केंद्रित दृष्टी आणि डीप-टेक कौशल्य यामुळे ते आधुनिक तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या आधारे विकसित केलेली प्रगत आणि कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचे भागीदार ठरतात. एकत्रितपणे, आम्ही हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या सीमा पुढे नेण्याचे लक्ष्य ठेवत असून, भारताच्या तांत्रिक स्वावलंबनात योगदान देण्यास कटिबद्ध आहोत.”
New Income Tax Bill 2025: लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर, करदात्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
लॉजिक फ्रूटने आतापर्यंत उच्च तंत्रज्ञानावर आधारित 100 हून अधिक सोल्युशन्स यशस्वीपणे विकसित केली आहेत. संरक्षण संशोधन संस्थां, एरोस्पेस क्षेत्रातील नवसंशोधन करणाऱ्या कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य उद्योगांसोबत कंपनी समन्वय साधून आणि संयुक्तपणे काम करते. त्यांच्या ग्राहकांमध्ये इस्रो, डीआरडीओ, एचएएल तसेच कोलिन्स एरोस्पेस (अमेरिका), कांडू (स्वित्झर्लंड), लॅटिस (अमेरिका) आणि अक्रॉनिक्स (अमेरिका) यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. संशोधनाधारित उत्पादनांमध्ये सिंगल बोर्ड कॉम्प्युटर्स, आयएफ आणि आरएफ रेकॉर्डर्स, स्केलेबल डेटा अक्विझिशन सिस्टम्स आणि एआय-सक्षम एव्हिओनिक्स डिस्प्ले यांचा समावेश असून, ही सर्व उत्पादने आधुनिक एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
ही भागीदारी वाढीच्या नव्या संधी निर्माण करेल, प्रगत संशोधन आणि विकास उपक्रमांना गती देईल आणि दोन्ही कंपन्यांना भारतातील संरक्षण तंत्रज्ञान आणि उच्च कार्यक्षमतेच्या संगणन क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देईल.