• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Servicenow India Cx Report 2026 Customer Loyalty At Risk

भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

सर्विसनाऊच्या २०२६ च्या अहवालानुसार, भारतातील ४०% ग्राहक केवळ एका खराब अनुभवामुळे ब्रँड बदलण्यास तयार आहेत. सेवेतील विलंबामुळे ग्राहकांचे वर्षाला सरासरी १०.८ तास वाया जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 04:10 PM
भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया (Photo Credit- AI)

भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया (Photo Credit- AI)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 

  • भारतात ‘कस्टमर एक्सपिरियन्स’ धोक्यात?
  • एका वाईट अनुभवामुळे ४०% ग्राहक कायमचे तुटणार
  • ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल
ग्राहकांच्‍या वाढत्‍या अपेक्षा, विखुरलेले सेवा प्‍लॅटफॉर्म्‍स आणि सहानुभूतीचा अभाव हे भारतातील ग्राहक निष्‍ठेमधील सर्वात मोठ्या जोखीम ठरत आहेत. भारतातील ५,००० हून अधिक ग्राहक आणि ४२५ ग्राहक सेवा व्‍यावसायिकांच्‍या प्रतिसादांच्‍या आधारावर सर्विसनाऊच्‍या तिसऱ्या कस्‍टमर एकस्‍पीरिअन्‍स (सीएक्‍स) अहवालामधून निदर्शनास येते की, ऑटोमेशनमुळे गती व सोयीसुविधा वाढत असल्‍या तरी संरचनात्‍मक तफावती भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या, एआय-समर्थित सेवा अर्थव्‍यवस्‍थेमधील विश्वास कमी करत आहेत.

भारतातील ग्राहक सेवा क्षेत्र महत्त्वपूर्ण वळणावर

फक्त एका वाईट अनुभवामुळे व्‍यवसायांना १० पैकी ४ ग्राहक कायमचे गमावावे लागू शकतात. या संशोधनामधून निदर्शनास येते की, सेवा-संबंधित समस्या सोडवण्याच्या प्रयत्‍नात भारतातील ग्राहकांचे वर्षाला सरासरी १०.८ तास वाया जातात. एआयचा वापर वाढत असताना देखील सेवा प्रदान करण्याची प्रक्रिया अजूनही गुंतागुंतीची आहे. एका ग्राहकाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी ग्राहक सेवा प्रतिनिधींना सरासरी चार वेगवेगळ्या सिस्टिम्सवर काम करावे लागते. यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि समस्‍येचे निराकरण होण्‍यास विलंब होतो. यामधून सर्व सेवा एकाच ठिकाणी देणाऱ्या युनिफाइड सर्विस प्लॅटफॉर्मची गरज दिसून येते.

”भारतातील सेवेच्‍या बाबतीत ग्राहक अनुभव महत्त्वपूर्ण वळणावर आहे. उद्योगांनी एआयमध्‍ये गुंतवणूक केली आहे, पण अंतर्गत पायाभूत सुविधा, विखुरलेल्‍या यंत्रणा, एकमेकांशी संबंध नसलेला डेटा आणि स्‍वतंत्र कामकाज पद्धती यामुळे उद्योगांना प्रगती करण्‍यामध्‍ये अडथळ्यांना सामना करावा लागत आहे,” असे सर्विसनाऊ इंडिया टेक्‍नॉलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. सुमीत माथूर म्‍हणाले. ”सध्‍या उपलब्‍ध असलेल्‍या संसाधनांना एकत्र करणे ही मोठी संधी आहे, ज्‍यामुळे एआय आणि कर्मचाऱ्यांची कौशल्‍ये एकत्रित प्रभावी ठरू शकतात. सर्विसनाऊ याच परिवर्तनाला सक्षम करत आहे.” सर्विसनाऊच्‍या २०२६ अहवालामधून भारतातील ग्राहक अनुभव प्रवासावर प्रभुत्‍व गाजवणारी तीन संरचनात्‍मक परिवर्तने निदर्शनास येतात.

सहानुभूतीचा अभाव

आज भारतातील ग्राहक मोठ्या प्रमाणात जलद, विनासायास व स्थितीशी सुसंगत सेवा मिळण्‍याची अपेक्षा करत आहेत. पण ग्राहकांना सेवा घेताना सतत येत असलेल्‍या निराशेमुळे संवादामध्‍ये अडथळा येत आहे, ज्‍याबाबत ग्राहकांचे मत पुढीलप्रमाणे:

  • ४८ टक्‍के ग्राहक म्‍हणतात की, सेवेसंदर्भात संवादांमध्‍ये सहानुभूतीचा अभाव आहे, ज्‍यामध्‍ये अनेकदा ग्राहकांची पार्श्वभूमी व समस्‍या नीट समजून घेतली जात नाही, जे निराशा येण्‍याचे प्रमुख कारण आहे.
  • ४५ टक्‍के ग्राहक म्‍हणतात की, त्‍यांना एकाच कामासाठी अनेक व्‍यक्तींकडे किंवा विभागांकडे जावे लागते, ज्‍यामधून सेवा विखुरलेली व अवैयक्तिक असल्‍याचे दिसून येते. या तफावतीला दूर करणे कार्यक्षम प्रवासांमधून ग्राहकांसोबत अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्‍यासाठी महत्त्वाचे असेल.
टीव्‍हीएस सप्लाय चेन सोल्यूशन्सचे ग्लोबल चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर दिनेश नारायण म्हणाले, “आजच्या पुरवठा साखळी क्षेत्रात ग्राहक अनुभव म्हणजे फक्त सेवा देणे नव्हे, तर आपण बदलांना हुशारीने देणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून आहे. नेटवर्क अधिक गुंतागुंतीचे होत आहेत, ज्‍यामुळे डेटा, कार्यप्रवाह आणि व्‍यक्तींना रिअल-टाइममध्‍ये एकत्र आणणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सची गरज आहे. सर्विसनाऊसोबत आमच्‍या अनुभवामधून निदर्शनास येते की, एआय-आधारित वर्कफ्लो जागतिक ऑपरेशन्समध्ये अधिक स्पष्टता आणि जलद निर्णयक्षमता आणू शकतात. या सीएक्‍स अहवालामधील निष्कर्ष प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येत असलेल्‍या अनुभवांशी मिळतेजुळते आहेत. आपल्या वर्कफ्लोमध्ये इंटेलिजन्सचा समावेश करणाऱ्या कंपन्‍या सातत्यपूर्ण, स्थिर आणि ग्राहक-केंद्रित परिणाम देण्यास अधिक सक्षम असतात.”

Women’s Day : खास महिलांसाठी होम क्रेडिट इंडियाचे संशोधन! ‘क्‍वाइट फायनान्शियल रिवॉल्‍यूशनरीज’ म्हणून नवी ओळख

ग्राहक आता कोणतीही तडजोड करण्‍यास तयार नाहीत

भारतातील ग्राहक आज सेवेमध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे अडथळे सहन करण्‍यास तयार नाहीत, जेथे उत्तम सेवेमधून त्‍यांचा विश्वास वाढतो, तसेच ब्रँड निवडीवर परिणाम होतो. अपेक्षेप्रमाणे सेवा मिळाली नाही तर ग्राहकांमध्‍ये निराशा पसरते आणि खराब कामगिरी करणाऱ्या व्यवसायांविरुद्ध ग्राहक पुढीलप्रमाणे पावले उचलतात:

  • ३४ टक्‍के ग्राहक सार्वजनिक स्‍तरावर अभिप्राय व्‍यक्त करतात किंवा तक्रारी नोंदवतात, ज्यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेवर मोठा परिणाम होतो.
  • ३७ टक्‍के ग्राहक आपला वाईट अनुभव कुटुंबिय आणि मित्रांसोबत शेअर करतात, ज्यामुळे या समस्येचा परिणाम फक्त एका ग्राहकापुरता मर्यादित न राहता अधिक विस्तारतो.
  • ५३ टक्‍के ग्राहकांनी अस्पष्ट स्पष्टीकरणामुळे नाराजी व्यक्त केली आहे, यामधून निदर्शनास येते की ग्राहक आता सेवा संवादामध्ये अचूकता आणि भावनिक समज या दोन्ही गोष्टींची अधिक अपेक्षा करत आहेत.

प्‍लॅटफॉर्मसाठी आवश्‍यक गोष्‍टी

ग्राहकांना सुलभ व उत्‍साहवर्धक अनुभव योगायोगाने मिळत नाही, तर एकमेकांशी संलग्‍न असलेल्‍या प्‍लॅटफॉर्म्‍समुळे शक्‍य होते, ज्‍यामध्‍ये तात्‍पुरते उपाय कामी ठरत नाहीत. ग्राहक सेवा प्रतिनिधी आपला फक्‍त ४८ टक्‍के वेळ ग्राहकांसाठी व्‍यतित करतात, तर उर्वरित वेळ विखुरलेल्या यंत्रणेमुळे वाया जात आहे. परिणामी व्यवसायाचे मूल्य कमी होत आहे. सेवा कार्यांमध्‍ये सुलभता आणणे आणि त्यांना एकमेकांशी जोडणे हे मोठ्या प्रमाणात सर्वोत्तम व विनासायास अनुभव देण्‍यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. सेवा प्रतिनिधींना सामना करावी लागणारी प्रमुख आव्‍हाने पुढीलप्रमाणे:
  • गुंतागुंतीच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी सरासरी जवळपास ३९ तास लागतात.
  • ३० टक्‍के प्रतिनिधी म्‍हणतात की, साधने अधिक प्रमाणात असल्‍यास वेग मंदावतो.
”व्‍यवसायांना आजच्‍या अनुभवात्‍मक अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी या तफावतींना दूर करणे पर्याय राहिला नसून धोरणात्‍मक बनले आहे,” असे श्री. माथूर म्‍हणाले. ”सहानुभूती, गती व सर्वोत्तमता हे ब्रँड निष्‍ठेचे नवीन पैलू आहेत आणि उद्योगांनी या गोष्‍टींना प्राधान्‍य देणाऱ्या प्‍लॅटफॉर्म्‍समध्‍ये गुंतवणूक केली पाहिजे.”

एजंट एक्‍स्‍पीरिअन्‍सची अंतर्गत बाजू

ग्राहक सेवा प्रतिनिधी एआयकडे प्रगतीचा मार्ग म्‍हणून पाहतात.

  • ५३ टक्‍के प्रतिनिधी म्‍हणतात की, नेक्‍स्‍ट-जनरेशन सीएक्‍स म्‍हणजेच उच्‍च दर्जाचा ग्राहक अनुभव देण्‍यासाठी एआय महत्त्वाचे आहे.
  • ५२ टक्‍के प्रतिनिधी म्‍हणतात की, एआयमुळे कामाचा भार व तणाव कमी झाला आहे.
असे असताना देखील कार्यसंचालनांमध्‍ये आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे. सेवा प्रतिनिधी आपला फक्त ४८ टक्‍के वेळ प्रत्यक्ष ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी व्‍यतित करतात, तर उर्वरित वेळ प्रशासकीय कामे आणि एकमेकांशी न जोडलेल्या यंत्रणांमध्ये माहिती शोधण्यात वाया जातो.

उत्‍पादकता वाढवण्‍याचे साधन म्‍हणून सीएक्‍स

सर्विसनाऊच्‍या कस्‍टमर एक्‍स्‍पीरिअन्‍स अहवाल २०२५ ने निदर्शनास आणले की सेवा क्षेत्रातील विलंबामुळे भारतातील ग्राहकांचे एकत्रित वर्षाला १५ बिलियन तास वाया जातात, यामधून व्यवसायांसाठी ५५ बिलियन डॉलर्सच्या उत्पादकतेची संधी दिसून येते. ६६ टक्‍के ग्राहकांनी एआयवर विश्वास दाखवला आहे आणि ८० टक्‍के ग्राहक आधीच चॅटबॉट्सचा वापर करत आहेत. ही पार्श्वभूमी पाहता सीएक्सचे आधुनिकीकरण व्‍यवसायांसह नागरिकांकरिता देशाची आर्थिक कार्यक्षमता आणि उत्पादकतेसाठी महत्त्वाचे साधन मानले जात आहे.

भारतात सीएक्‍सचे महत्त्व: गतीशील, सहानुभूतीशील, सक्षम

भारतातील भावी ग्राहक अनुभव सेवा कंपन्‍या एकाच, एकमेकांशी जोडलेल्‍या ऑपरेटिंग मॉडेलमध्‍ये एआय व मानवी बुद्धिमत्तेला प्रभावीपणे एकत्र करण्‍यावर अवलंबून असेल:

  • एआय मोठ्या प्रमाणात व गतीशीलपणे गुंतागुंतीचे हाताळणी करेल.
  • मानवी प्रतिनिधी सहानुभूती, निर्णयक्षमता व विश्वास देतील.
  • युनिफाईड प्‍लॅटफॉर्म्‍स अंदाज वर्तवणाऱ्या व एकमेकांशी जोडलेल्‍या सेवा प्रवासांचे नियोजन करतील.
सेवा क्षेत्रातील तफावतींमुळे भारतातील ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया जातात आणि निम्म्याहून अधिक ग्राहक ब्रँड बदलण्‍यास उत्‍सुक आहेत, ज्‍यामुळे सीएक्‍स आर्थिक प्राधान्‍यक्रम बनले आहे. व्‍यवसायामधील भावी प्रमुख कोणत्याही प्रकारच्या सेवा त्रुटी रोखण्यासाठी एआय आणि मानवी कौशल्ये एकाच प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे आणण्‍यास सक्षम असतील. सर्विसनाऊ सेवा प्‍लॅटफॉर्म्‍सना एकत्र आणत, जबाबदारीने एआयचा अवलंब करत आणि उद्योगांना गतीशील, स्‍मार्ट व अधिक मानवी ग्राहक अनुभव देण्‍यास मदत करत या प्रवासाला साह्य करत आहे.

संशोधन कार्यपद्धती

एआय ग्राहक अनुभवाला आकार देत असलेल्‍या पद्धतीचे परीक्षण करण्‍यासाठी सर्विसनाऊने संशोधन कंपनी थॉटलॅबसोबत सहयोग केला. या सहयोगांतर्गत १८ देशांमध्‍ये आणि आठ उद्योगांमध्‍ये सर्वसमावेशक जागतिक संशोधन करण्‍यात आले. या अहवालाच्‍या इंडिया एडिशनमध्‍ये भारतातील ५,००० ग्राहक आणि ४२५ ग्राहक सेवा व्‍यावसायिकांच्‍या प्रतिसादांचा समावेश आहे.

2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

Web Title: Servicenow india cx report 2026 customer loyalty at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना
1

2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर
2

तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

जागतिक युद्धाच्या सावटाखाली भारताचा मोठा निर्णय! रशियासोबत मोठा संरक्षण करार शक्य; शत्रूची धडधड वाढली
3

जागतिक युद्धाच्या सावटाखाली भारताचा मोठा निर्णय! रशियासोबत मोठा संरक्षण करार शक्य; शत्रूची धडधड वाढली

Dubai in a War Zone : जर बुर्ज खलिफाचे हल्ल्यात नुकसान झाले तर मिळणार 1,50,00,000 ? नेमकं कारण काय?
4

Dubai in a War Zone : जर बुर्ज खलिफाचे हल्ल्यात नुकसान झाले तर मिळणार 1,50,00,000 ? नेमकं कारण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठला शिल्लक?

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठला शिल्लक?

Mar 05, 2026 | 04:10 PM
भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

Mar 05, 2026 | 04:10 PM
Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Mar 05, 2026 | 04:09 PM
TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

Mar 05, 2026 | 03:57 PM
Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Mar 05, 2026 | 03:52 PM
jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

Mar 05, 2026 | 03:50 PM
Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Mar 05, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.