'हा' डिफेन्स स्टॉक आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! 3 महिन्यात दिला 46 टक्के परतावा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Defense Stocks Marathi News: गेल्या एका महिन्यापासून संरक्षण क्षेत्रातील समभागांची कामगिरी मजबूत आहे. यापैकी एक शेअर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड किंवा बीईएल आहे. गेल्या एका महिन्यात बीईएलच्या शेअर्सच्या किमती २५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत तर गेल्या ३ महिन्यांत या शेअरने ४६ टक्के परतावा दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर्समधील ही वाढ बुधवारीही कायम राहिली.
आज बाजार उघडताच, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर ४ टक्क्याने वाढून ३७९ रुपयांवर पोहोचला. ३७९ रुपयांची पातळी ही ५२ आठवड्यांतील स्टॉकची नवीन उच्चांकी पातळी आहे. तज्ञांच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि बीईल हे दोन्ही संरक्षण स्टॉक्स भविष्यात ही गती कायम ठेवतील. या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा स्टॉक ४३० रुपयांच्या लक्ष्य किमतीला स्पर्श करू शकतो. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या मते येत्या काळात या स्टॉक मध्ये भविष्यातही तेजी कायम राहील, या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजने यापूर्वी स्टॉकवर ३५० रुपयांची लक्ष्य किंमत दिली होती. मार्च तिमाहीत कंपनीच्या चांगल्या निकालांनंतर ब्रोकरेजचा हा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे.
नुवामा ब्रोकरेजने सांगितले की, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने मार्च तिमाहीत ३०.६ टक्के नफा नोंदवला होता, जो बाजारातील २४.७% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांच्या मार्गदर्शनात म्हटले आहे की त्यांचे महसूल १५ टक्क्यांनी आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन २७ टक्क्यांनी वाढू शकते. जे सकारात्मकता दर्शवत आहे.
नुवामा ब्रोकरेज म्हणते की जर कंपनीने त्यांच्या पाइपलाइनमधील मोठ्या ऑर्डर वेळेवर पूर्ण केल्या तर कंपनीच्या ऑपरेशनल कामगिरीत आणखी सुधारणा दिसून येईल, ज्यामुळे री-रेटिंगला समर्थन मिळेल. आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२५ पर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ची ऑर्डर बुक ₹७१,६५० कोटी किमतीची आहे. यामध्ये ३५९ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या निर्यात ऑर्डरचा समावेश आहे.
चौथ्या तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा १८ टक्क्यांनी वाढून २१२७ कोटी रुपये झाला आहे.
मार्च तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ९३४४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा मार्च तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल वर्षानुवर्षे ७ टक्के वाढून ९,१५० कोटी रुपये झाला.