Share Market Holiday: 2026 मध्ये शेअर बाजार कधी राहील बंद? जाणून घ्या सविस्तर
Share Market Holiday: येत्या २०२६ या नव्या वर्षात भारतीय शेअर बाजार १५ दिवस बंद राहणार आहे. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्यांसह सणांचा देखील समावेश आहे. वर्षभरात १५ दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील. जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील. तसेच, शनिवार आणि रविवारी देखील शेअर बाजारातील व्यवहार बंद असतील. त्यामुळे गुंतवणूकदरांनी सुट्ट्यांबद्दल माहिती करून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
हेही वाचा: Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा
शेअर बाजार कधी आणि कोणत्या कारणांसाठी बंद राहतील?
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिनी शेअर बाजार बंद राहतील.
३ मार्च – होळीच्या दिवशी शेअर बाजार बंद राहतील.
२६ मार्च – श्री राम नवमीच्या दिवशी शेअर बाजार बंद राहतील.
३१ मार्च – श्री महावीर जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
३ एप्रिल – गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
१४ एप्रिल – डॉ. बी.आर. आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
१ मे – कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
२८ मे – बकरी ईदनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
२६ जून – मोहरमनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
१४ सप्टेंबर – गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
२ ऑक्टोबर – गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
२० ऑक्टोबर – दसऱ्यानिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
१० नोव्हेंबर – दिवाळीनिमित्त कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
२४ नोव्हेंबर – प्रकाश पर्वानिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
२५ डिसेंबर – ख्रिसमसनिमित्त शेअर बाजार बंद राहतील.
वर्षभरात या दिवशी शेअर बाजारात व्यवहार बंद राहणार आहेत. यामध्ये वर्षभरातील शनिवार आणि रविवार यांचा देखील समावेश आहे. या दिवशी कोणतेही शेअर खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी व्यवहार करण्यापूर्वी या सुट्ट्यांची माहिती ठेवणे आवश्यक आहे. बाजार उघडल्यानंतर व्यवहारांवर याचा परिणाम दिसून येतो. कधी कधी व्यवहाराचा ताण पुढील दिवशी वाढतो. म्हणून सुट्ट्यांचा गुंतवणूक नियोजनावर थेट परिणाम होतो. तसेच, जानेवारी २०२६ मध्ये बँकांना १६ दिवस सुट्ट्या आहेत. अशावेळी तुम्ही ऑनलाइन व्यवहार करू शकता.






