गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! भारतीयांसाठी ग्लोबल फंड्सची घोषणा, १० डॉलर्सपेक्षा कमी रकमेसह गुंतवणूक शक्य
● गुंतवूणकदारांना गिफ्ट व लक्झमबर्ग-आधारित फंड उपलब्ध होतील.
● इक्विटी, निश्चित उत्पन्न आणि थीमॅटिक संधींमधील सक्रिय व निष्क्रिय धोरणे उपलब्ध
● गुंतवणूकदार १० डॉलर्स इतक्या कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकतात आणि कधीही रिडिम करू
मुंबई: वेस्टेड फायनान्स या भारतीयांसाठी जागतिक गुंतवणूक विशेषज्ञ कंपनीने आज (4 नोव्हेंबर) ग्लोबल फंड्सच्या लाँचची घोषणा केली. हा भारतीय गुंतवणूकदारांसाठी डीएसपी, ब्लॅकरॉक, वॅनगार्ड, पीआयएमसीओ, फ्रँकलिन टेम्प्लटन आणि मॉर्गन स्टॅण्ली यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांद्वारे व्यवस्थापित ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय फंड्समध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा नवीन मार्ग आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेर गुंतवणूक करणे गुंतागूंतीचे आणि महागडे वाटले आहे. बहुतांश व्यक्तींना फीडर फंड्स किंवा भारत-सूचीबद्ध ईटीएफवर अवलंबून राहावे लागत होते, जे फक्त काही पर्याय देतात, जास्त शुल्क आकारतात आणि गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात काय मिळेल याबद्दल फारशी स्पष्टता देत नाहीत. यामध्ये बदल करण्यासाठी वेस्टेडचे ग्लोबल फंड्स उत्पादन डिझाइन करण्यात आले आहे.
“ग्लोबल फंड्ससहभारतीय गुंतवणूकदारांना फिडेलिटी, पीआयएमसीओ व ब्लॅकरॉक अशा काही प्रसिद्ध मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडून फंड मिळवण्यामध्ये येणारे अडथळे दूर करत आहोत,” असे वेस्टेड फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक विराम शाह यांनी सांगितले. तसेच भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापकांनी निर्माण केलेल्या गिफ्ट-आधारित फंड्सच्या उपलब्धतेसाठी डिजिटल प्रवास देखील प्रदान केला आहे. या लाँचमुळे जागतिक संस्था आणि श्रीमंत व्यक्ती भारतातील दैनंदिन गुंतवणूकदारांना समान संपत्ती निर्माण करण्याची साधने देऊ शकतात, जी साधी, पारदर्शक आणि नियमांचे पूर्णपणे पालन करणारी आहेत.”
ही नवीन ऑफरिंग भविष्याला आकार देत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्यसेवा आणि उदयोन्मुख बाजारेठा अशा जागतिक थीम्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. गुंतवणूकदार युरोपियन व जपानी इक्विटीजपासून जागतिक बॉंड बाजारपेठांपर्यंत विविध भौगोलिक क्षेत्रे व मालमत्तावर्गांमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. तसेच, हे फंड्स कोणत्याही रूपया घसाराविरोधात संरक्षक म्हणून काम करू शकतात.
ग्लोबल फंड्स ऑफरिंग गिफ्ट सिटीचा पहिला रिटेल आऊटबाऊंड फंड, डीएसपी ग्लोबल इक्विटी फंड देखील ऑनलाइन उपलब्ध करून देते. वेस्टेडने भारतात अद्वितीय तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे गुंतवणूकदारांना स्थानिक म्युच्युअल फंड्स उपलब्ध होण्याच्या सुलभतेप्रमाणेच गिफ्ट सिटी फंड्स उपलब्ध करून देते. लवकरच, वेस्टेड एनआरआयना देखील इनबाऊंड गिफ्ट फंड्स उपलब्ध करून देईल, ज्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याच्या संधी सहजपणे उपलब्ध होतील.
ग्लोबल फंड्समध्ये गुंतवणूक फक्त १० डॉलर्सपासून (जवळपास ८८० रूपये) पासून करता येऊ शकते आणि गुंतवणूकदारांना कोणताही प्रवेश किंवा निर्गमन शुल्क आकारले जात नाही. ग्लोबल फंड्समध्ये कर सवलती देखील आहेत. त्यांच्यावर यूएस इस्टेट टॅक्स लागू होत नाही, जो ४० टक्क्यांपर्यंत जास्त आहे. भारतात, देशांतर्गत कर्ज म्युच्युअल फंडांमधून मिळणाऱ्या नफ्यांप्रमाणेच कर आकारला जातो – गुंतवणूकदाराच्या उत्पन्न स्लॅब दराने अल्पकालीन नफा (२४ महिन्यांपेक्षा कमी) आणि दीर्घकालीन नफा १२.५ टक्के आहे. बेस्टेड फाइलिंग सुलभ करण्यासाठी तपशीलवार कर अहवाल देखील प्रदान करेल.
“भारतात बहुतांश पोर्टफोलिओ अजूनही केंद्रित आहेत,” असे शाह पुढे म्हणाले. ”शाश्वत संपत्ती निर्मितीसाठी जागतिक वैविध्यीकरणाची गरज आहे. यामुळे जोखीम कमी होण्यास आणि स्थानिक बाजारपेठातील संषर्षांपासून किंवा धोरणामधील बदलांपासून पोर्टफोलिओचे संरक्षण करण्यास मदत होते. यूएस व चीनमधील एआय असो किंवा युरोपमधील शुद्ध ऊर्जा परिवर्तन असो विकासाच्या गाथा जगभरात कुठेही होऊ शकतात. सुविधा उपलब्ध असल्याने भारतीय गुंतवणूकदार मागे न राहण्याची खात्री मिळेल.”
वेस्टेडने गुंतवणूक प्रक्रिया सोपी ठेवली आहे. अॅप किंवा वेबसाइटद्वारे जलद डिजिटल केवायसी आणि एलआरएस घोषणा पूर्ण केल्यानंतर गुंतवणूकदार इक्विटी, निश्चित उत्पन्न आणि थीमॅटिक धोरणांमध्ये ग्लोबल फंड्सची क्युरेटेड यादी ब्राउज करू शकतात. गुंतवणूक केल्यानंतर ते रिअल टाइममध्ये त्यांची कामगिरी आणि वैविध्यीकरण सर्वकाही एकाच ठिकाणी पाहू शकतात.
(नोट : कृपया कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.)






