(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
देवखेळ ही नवीन वेब सिरीज नुकतीच Zee5 वर प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही. कारण या वेब सिरीज मध्ये पौराणिक कथा, परंपरा, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेब सिरीज मध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी ही मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच अंकुश चौधरीचे काम हे लक्षवेधी ठरले आहे, कारण अभिनेत्याने यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
काय आहे ‘देवखेळ’ ची कथा?
देवखेळ ही एक कोकणातील परंपरा आणि श्रद्धा असलेल्या लोककथांपासून प्रेरित, गहन मानसशास्त्रीय थरारपट आहे. या वेब सिरीज मध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्टपणे दाखवण्यात आला आहे. हा महत्त्वाचा विषय लोकांपर्यंत या कथेद्वारे पोहोचवणे, हे उत्तम काम दिग्दर्शकाने केले आहे.
इंग्रजी चित्रपट ‘करेज’ने जागतिक स्तरावर आपली ओळख केली निर्माण! संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत
मराठी अभिनेता अंकुश चौधरी ने यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, या कथेची सुरुवात इन्स्पेक्टर विश्वासराव सरंजामे याचे एन्ट्रीने होते. ज्याची बदली रत्नागिरीतील एका देवतळी गावात होते. या देवतळी गावात रात्री शिमगोत्सवादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू होतो. आणि गावातील लोकं हा शंकासुराचा शाप आहे, शंकासुराने त्याला मारले आहे असा विश्वास ठेवू लागतात. आणि या शिमगोत्सवादरम्यान वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा ही एक श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे, आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीला शंकासुराचा शाप नसून हा एक खून आहे याचा तपास घेण्याची सुरुवात इन्स्पेक्टर विश्वासराव करू लागतात. आणि ते गावकऱ्यांसमोर खूप ठोक पुऱ्यावांसोबत साध्य करतात. की या व्यक्तीचा झालेला मृत्यू हा खून आहे.
‘रणपती शिवराय’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित! नवीन तारीख करण्यात आली जाहीर
वेब सिरीज मधील संपूर्ण स्टार कास्ट
या वेब सिरीज मध्ये अंकुश चौधरी ची भूमिका ही लक्षवेधी ठरली आहे. कारण अंकुश चौधरीचे संवाद, डायलॉग डिलिव्हरी आणि त्याचे परिपूर्ण काम हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अभिनेत्याने पहिल्यांदाच वेब सिरीज मध्ये काम करून ओटीटीवर पदार्पण केले आहे. तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील या वेब सिरीज मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. यामध्ये अभिनेत्रीने सारिका निमकरची भूमिका साकारली आहे.
त्यांच्यासोबतच अरुण नलावडे, नारायण जाधव, यतीन कार्येकर, मंगेश देसाई, वीणा जामकर, ओंकार भोजने, सायली देवधर, विनायक जाधव संपूर्ण तगडी स्टारकास्ट देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत. ही वेब सिरीज पाहिल्यानंतर नक्कीच लोकांना विचार करायला भाग पाडेल यात शंकाच नाही.
‘महाराष्ट्रात श्रद्धेला जागा, आहे अंधश्रद्धेला नाही’ या उत्कृष्ट संवादासह 30 जानेवारी रोजी Zee5 वर प्रदर्शित झालेली ही वेब सिरीज लोकांनी नक्कीच पहावी. कारण एक गहन मानसशास्त्रीय या थरारक कथेत नेमकं काय दाखवण्यात आलं आहे? आणि श्रद्धा आणि परंपरेचा खेळ कसा रंगला आहे? हे सगळं वेब सिरीज पाहिल्यानंतरच उघड होणार आहे.






