फोटो सौजन्य - Social Media
काही वर्षांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते गुजरातच्या अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेन धावणार असल्याची चर्चेने सगळे वातावरण काबीज केले होते. अद्याप या चर्चेला खंड पडला नाही आहे. याउलट या सबंधित नवीन चर्चेला वेग आले आहे किंवा चर्चेला नवीन दिशा मिळाली असल्याचे म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून देशातील जनता भारतात बुलेट ट्रेन येणार तर आहे पण नेमके कधी येणार? असे अनेक प्रश्न सरकारला करत होती. परंतु, याचे उत्तर आता मिळताना दिसत आहे. भारत या विषयावर जपान देशाबरोबर सतत चर्चा करत आहे. जपानशी केलेला हा तह वास्तव्यात कधी येणार? असा प्रश्न भारतीय जनतेला पडला आहे.
भारतात बहुतेक लोकं भारतीय रेल्वेच्या रुळावर बुलेट ट्रेन धावताना पाहण्यास इच्छुक आहे. बुलेट ट्रेन संबंधित जपान आणि भारतामध्ये चर्चेचे वातावरण आहे. तसेच या चर्चेचा निकाल लवकरच समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतामध्ये बुलेट ट्रेनचे आगमण होण्यास किमान आणखीन २ वर्षे जातील असे सांगितले जात आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन गुजरातच्या अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणार आहे. ही ऐतिहासिक धाव पाहण्यासाठी तसेच अनुभवण्यासाठी भारतीय जनता उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी शिंकनसेन E5 ची ऑर्डर या वर्षाच्या अखेरीस दिली जाईल असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडॉर (NHSRCL) च्या एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, शिंकनसेन E5 च्या ऑर्डरसाठी चर्चा सुरू आहेत, ज्याला लवकरच अंतिम स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे. या बुलेट ट्रेनची कमाल स्पीड ३२० किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर हा कॉरिडॉर ताशी 250 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड ट्रेन्सच्या चाचणीसाठी देखील वापरला जाईल.
हे देखील वाचा : आयटी क्षेत्रात खळबळ! जगविख्यात आयटी कंपनी intel ला ‘ही’ कंपनी ताब्यात घेणार?
काही भारतीय जलद ट्रेनसाठी पर्याय म्हणून हि बुलेट ट्रेन धावणार असल्याचे सांगितले जात आहे. राजधानी तसेच शताब्दीसारख्या प्रीमियम ट्रेनच्या जागी भविष्यामध्ये ही बुलेट ट्रेन धावणार असल्यासाघोयी अफाट शक्यता आहे. राजधानी आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने धावतात.