Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर
सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. याशिवाय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे शेअर बाजारातील तेजी आज देखील कायम राहणार का, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. अमेरिका-चीन व्यापार करार आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची अपेक्षा आणि जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, पुन्हा एकदा सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,०५५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४३ अंकांनी जास्त होता. सोमवारी, भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ झाली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,९०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ५६६.९६ अंकांनी म्हणजेच ०.६७% ने वाढून ८४,७७८.८४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १७०.९० अंकांनी म्हणजेच ०.६६% ने वाढून २५,९६६.०५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ४१४.६५ अंकांनी किंवा ०.७२% ने वाढून ५८,११४.२५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आज, मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी सुमारे ६० कंपन्या त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. या आठवड्यात ३०० हून अधिक कंपन्या त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. टीव्हीएस मोटर, अदानी ग्रीन, टाटा कॅपिटल, जिंदाल स्टील, श्री सिमेंट्स, अदानी टोटल गॅस, ब्लू डार्ट, आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी यासारख्या आघाडीच्या कंपन्या आज त्यांचे उत्पन्न जाहीर करणार आहेत.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार टीव्हीएस मोटर, अदानी ग्रीन एनर्जी, टाटा कॅपिटल, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, इंडस टॉवर्स, अदानी पोर्ट्स, ओला इलेक्ट्रिक, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, आयटीसी, भारती एअरटेल, रेल विकास निगम, केफिन टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये भारत सीट्स, झोटा हेल्थ केअर, प्रिसिजन वायर्स इंडिया, कारट्रेड टेक आणि पराग मिल्क फूड्स यांचा समावेश आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये तितागढ रेल सिस्टम्स , हेरिटेज फूड्स आणि जिंदाल स्टील यांचा समावेश आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे आहे. ज्यामध्ये लॉरस लॅब्स लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, इटरनल लिमिटेड आणि वेल्सपन कॉर्प लिमिटेड यांचा समावेश आहे.






