फोटो सौजन्य - Social Media
रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील दिग्गज इंडस्ट्रीज मधील एक आहे. विविध क्षेत्रात आपले जाळे या कंपनीने पसरले आहे. हे जाळे फार विशाल आहे. फक्त देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे जाळे पसरले आहे. या जाळ्याची विशालता पेट्रोल इंडस्ट्रीज, ऑइल रिफायनरी, रिटेल अशा विविध उद्योगात पसरले आहे. दरम्यान, रिलायन्स सारखी मोठी इंडस्ट्री वेगवेगळ्या क्षेत्रात आपले जाळे पसरवून आहे. परंतु, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये या कंपनीचे काहीच कसा नेटवर्क नाही? असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. ते स्वाभाविक आहे, विविध क्षेत्रांमध्ये आपला इतका मोठा साम्राज्य उभे करणारे मुकेश अंबानी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये का नाही येत? हा प्रश्न फक्त तुम्हालाच नव्हे तर अनेक जणांना पडला आहे. त्याला तसे कारणही असल्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात नक्की काय आहे रिलायन्सचे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये पाऊल न ठेवण्याचे कारण.
हे देखील वाचा : Hyundai ने रिलीज केला 3-रो इलेक्ट्रिक SUV Ioniq 9 चे टीझर, नोव्हेंबरमध्ये होणार लाँच
रिलायन्सचा मुख्य मॉडेल बिझनेस टू बिझनेस आहे. रिलायन्स इंडस्ट्री व्यावसायिक टू व्यावसायिक व्यापार करण्यास जास्त पसंती देते. परंतु, ऑटोमोबाईल क्षेत्रात तसे नाही आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये व्यावसायिकाचा थेट संबंध ग्राहकांशी होतो. तसेच कार किंवा बाईक घेण्यासाठी खिशात लाखो रुपये असणे गरजेचे असते. जर तुम्हाला एखादी कार घ्यायची असेल तर तुमच्याकडे किमान पाच लाख असणे आवश्यक असते. तर त्यात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मागणी कमी आणि सप्लाय जास्त आहे. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीज ज्या क्षेत्रांमध्ये आहे त्या क्षेत्रांमध्ये मागणी जास्त आहे परंतु पुरवठा त्यामानाने कमी आहे.
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फक्त गाड्या विकणे इतकेच नसते. तर त्यांची डेव्हलपमेंट करणे, स्ट्रक्चर डिझाईन करणे, मॅन्युफॅक्चर करणे, तसेच त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणे, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामध्ये व्यवसायिकांना फार मोठा खर्च होतो. कदाचित, ऑटोमोबाईल क्षेत्रावर पैसे लावण्या पेक्षा इतर क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवणे जास्त सोयीस्कर ठरत असल्याने रिलायन्स ऑटोमोबाईल क्षेत्रात दिसून येत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. या क्षेत्रामध्ये आधीपासून बहुतेक अशा इंडस्ट्रीज आहेत, जे या क्षेत्रात आधीपासून अधिपत्य गाजवत आहेत.
हे देखील वाचा : एसयूव्ही सुद्धा देईल जबरदस्त मायलेज, आजच फॉलो करा ‘या’ Driving Tips
टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझुकी अशा अनेक कंपन्या आहेत. या स्पर्धेमध्ये पैसे आणि वेळ व्यर्थ करण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रात आणखीन भरारी घेण्यावर रिलायन्स जास्त भर देत असेल. तसेच ज्या क्षेत्रावर ऑटोमोबाईल क्षेत्र अवलंबून आहे ते म्हणजे एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी तसेच बॅटरी या व्यवसायात रिलायन्स आधीपासून आहे त्यामुळे रिलायन्स या क्षेत्रामध्ये येण्यापासून आणि स्वतःशीच स्पर्धा टाळण्यासाठी कदाचित ऑटोमोबाईल क्षेत्रात दिसून येत नाही.