फोटो सौजन्य - Social Media
आधाराने नुकतेच एका भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरतीच्या माध्यमातून ऑपरेटर तसेच सुपरवाईजरच्या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार होती. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि या भरतीच्या प्रक्रियेबाबत सखोल माहिती मिळवा. मुळात, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात आहात तर नक्कीच या संधीचा लाभ घ्या आणि संधीचे सोने करा.
कॉमन सर्विस सेंटर (CSC) या भरतीचे आयोजन केले आहे. मुळात, त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरले जात आहेत. २३ राज्यांमध्ये या भरतीचे आयोजन करण्यात आला आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. त्याचसह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि पंजाबसहित एकूण २३ राज्यांमध्ये या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा, बिहार आणि आंध्रप्रदेश या राज्यामध्ये भरतीसाठी अर्ज प्रक्रिया समाप्त झाली आहे. तर इतर राज्यांमध्ये अदयाप सुरु आहे. उमेदवारांना या भरतीसाठी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज कारण्यासाठी उमेदवारांनी कॉमन सर्विस सेंटर (CSC)च्या cscspv.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येणार आहे.
आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान १२वी किंवा १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १०वीसह २ वर्षांचा आयटीआय कोर्स किंवा १०वीसह ३ वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. याशिवाय उमेदवारांकडे UIDAI द्वारे प्रमाणित संस्थेकडून आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरचे सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे.
उमेदवारांना संगणकाशी संबंधित बेसिक स्किल्स देखील असणे आवश्यक आहे. पात्रतेसंबंधी अधिक तपशील उमेदवार भरतीच्या अधिसूचनेतून पाहू शकतात. अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही पदे एका वर्षाच्या करारावर भरली जाणार आहेत. वेतनाच्या बाबतीत निवड झालेल्या उमेदवारांना राज्य शासनाच्या नियमानुसार पगार देण्यात येणार आहे. आधारच्या या भरतीशी संबंधित कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी तसेच जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीचा आढावा घेण्यात यावा आणि अर्जाची प्रक्रिया पूर्णत्वास आणावी.