फोटो सौजन्य - Social Media
आताच्या स्पर्धात्मक युगात तरुणाई फक्त नोकरी करत थांबत नाही, तर त्याचबरोबर सतत नवे काही शिकण्याचा प्रयत्न करत असते. नोकरी सांभाळताना एखादी नवीन कौशल्ये आत्मसात करणं ही स्मार्ट यशाची गुरुकिल्ली ठरते. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आज विविध शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध आहेत, जे तुम्ही घरी बसून, आपल्या वेळेनुसार शिकू शकता.
हे कोर्सेस केंद्र व राज्य सरकारच्या उपक्रमांबरोबरच Google, IBM, Reuters सारख्या आघाडीच्या कंपन्यांकडूनही आयोजित केले जातात. काही कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत, तर काहींसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. यामध्ये काही कोर्सेस शिकण्यासाठी मोफत असले तरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शुल्क आकारले जाते. हे कोर्सेस 500 रुपये ते 15,000 रुपयांपर्यंत असू शकतात, पण त्यातून मिळणाऱ्या कौशल्यांची किंमत खूप मोठी असते.
Google च्या Cloud Skills Boost या प्लॅटफॉर्मवर दोन महत्त्वाचे AI कोर्सेस सध्या चर्चेत आहेत:
या कोर्समध्ये तुम्ही AI आधारित चॅटबॉट्स वापरून लेख, प्रोजेक्ट, असाइनमेंट कसे तयार करायचे, हे शिकता. यात टेक्स्ट जनरेशन, संवाद कौशल्य, संशोधनात्मक लेखन यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात.
कालावधी: ८ तास
या कोर्समध्ये टेक्स्टवरून फोटो, स्केचेस, कार्टून्स, AI आर्ट तयार करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते. कमी रिझोल्युशनचे फोटो सुधारणे, चेहर्यांचे डिझाईन बनवणे यासारख्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवतात.
कालावधी: ८ तास
अर्ज कसा कराल?
या कोर्सेसमुळे केवळ तुमचे स्किलसेट अपडेट होणार नाही, तर तुमच्या करिअरला दिशा देणारा एक नवा मार्गही खुला होईल. AI क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचं असेल, तर हे कोर्सेस एक उत्तम संधी आहेत.