पुन्हा शाळा भरली! १६ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र (Photo Credit - AI)
शिक्षकांवर फुलांची उधळण अन् जंगी स्वागत
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी श्रीखंडे, शिक्षक हरिचंद्र फिरके, प्रभाकर कुमावत, राजेंद्र पाटील, राजू कोलते, बाबासाहेब फरकाडे, न दकिशोर पाटील, उपसरपंच नंदू फरकाडे या उपस्थित शिक्षकांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपला परिचय करून दिला. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुन्हा रंगला भूगोलाचा तास; जुन्या आठवणींना उजाळा
आपले मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना शाळेमुळे व गुरुजांनी त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दिल्यामुळेच आम्ही चांगले नागरिक बनू शकलो, असे सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या दहावीच्या वर्गात बसले. यावेळी शिक्षक एन.पी. पाटील यांनी भूगोल विषयाचा तास घेतला. ज्यामुळे उपस्थितांचे बालपण काही काळासाठी पुन्हा जागे झाले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांमध्ये २० मुली आणि ३५ मुले उपस्थित होते. यावळी खो-खो, संगीत खुर्ची, कबड्डीचे सामने सर्वांनी उत्साहात खेळले. मैदानावर खेळताना आणि विजयाचा आनंद साजरा करताना सर्वांचे चेहरे आनंदाचे उजळले होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
यांनी घेतले परिश्रम
तब्बल १६ वर्षांनंतर जुने वर्गमित्र आणि शिक्षक एकत्र आल्याने सर्व भावनिक वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी सचिन रूद्रे, नरेश फरकाडे, मयूर जाधव, रमेश गोडसे, जनार्धन ताठे, बिलाला शहा, प्रभाकर ताठे, शत्रुगुण फलके, सतीश ताठे, राजू दामले, गणेश पाटील, दिलीप फरकाडे, रवी कटारे, अजय फरकाडे, शरीफ शहा, गजानन कटारे, दिनेश ताठे, सोपान भोसले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बिलाल शहा तर आभार सतीश ताठे यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी एकमेकांशी केले हितगूज
विद्याथ्यांनी परिचय करून देत एकमेकांशी हितगुज केले. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते प्रत्येकजण आपली शाळा आता कशी दिसते, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता, वर्गामित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
हे देखील वाचा: Study Tips : मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतोय? याला पालक जबाबदार तर नाहीत? जाणून घ्या






