फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वात मोठी उर्जा कंपनी NTPC Limited (National Thermal Power Corporation) ने ‘असिस्टंट केमिस्ट ट्रेनी’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. NTPC कडून नुकतीच Advt. No. 09/25 ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 17 मे 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
NTPC सध्या 80,155 मेगावॅट उर्जा निर्मिती क्षमतेसह कार्यरत असून, 2032 पर्यंत ही क्षमता 130 GW वर नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी कंपनीला उच्चशिक्षित, बुद्धिमान आणि कार्यक्षम उमेदवारांची आवश्यकता आहे. त्यामुळे असिस्टंट केमिस्ट ट्रेनी या पदासाठी भरतीद्वारे नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (Assistant Chemist Trainee – ACT) पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मुळात, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा किंवा मुलाखत, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी याच्या आधारे केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी careers.ntpc.co.in किंवा www.ntpc.co.in या वेबसाइटला भेट द्यावी.
अर्ज करण्यासाठी खालील कृती करा:
महत्त्वाच्या तारखा:
NTPC मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपली उमेदवारी निश्चित करावी. अधिक माहीतीसाठी जाहीर अधिसुचनेचा आढावा घेण्यात यावा.