फोटो सौजन्य - Social Media
मुंबई आणि वसईमध्ये शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अरिहंत अकॅडमीने आणखी एक मोठे पाऊल उचलले असून, त्यांनी कार्मेल क्लासेस आणि कार्मेल ट्यूशन्समधील १००% हिस्सा संपादन केला आहे. या संपादनाच्या माध्यमातून अरिहंतने वसईसह एकूण मुंबईतील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. १९९४ पासून कार्यरत असलेली कार्मेल क्लासेस ही वसईमधील एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. फक्त १२ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेने आजपर्यंत ३०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. संस्थापक शिबू नायर हे गेली ३० वर्षे वसईमध्ये अध्यापन करत असून, सध्या संस्थेमध्ये २,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या संपादनामुळे वसईमधील विद्यार्थ्यांना आता अरिहंत अकॅडमीचे प्रगत अभ्यासपद्धती, तज्ञ शिक्षकवर्ग आणि तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण सुविधा लाभतील. अरिहंतच्या या पावलामुळे वसईमध्ये राज्य मंडळ, CBSE, ICSE, इयत्ता ८वी ते १२वी, तसेच CA, CS आणि IELTS सारखे प्रोफेशनल कोर्सेस देखील उपलब्ध होतील.
या विलीनतेवर भाष्य करताना अरिहंतचे सह-संस्थापक अनिल कपासी म्हणाले, ”आमचे प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम स्टडी मटेरिअल्स आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान-संचालित अध्ययन अनुभव देण्याचे ध्येय आहे. या विस्तारीकरणासह आम्ही खात्री घेत आहोत की वसई आणि एकूण मुंबईमधील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली दर्जेदार शिक्षण मिळेल. आम्हाला माहित आहे की विद्यार्थ्यांना संरचनात्मक मार्गदर्शन व अध्ययन वातावरणाची गरज आहे, जे जिज्ञासूवृत्ती आणि यशाला चालना देतात. हे संपादन आम्हाला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास आणि त्यांना त्यांची शैक्षणिक ध्येये संपादित करण्यास सर्वोत्तम संसाधने व मार्गदर्शनासह सुसज्ज करण्यास मदत करते.”
शिबू नायर यांनी देखील आनंद व्यक्त करत सांगितले की, “अरिहंतसोबतच्या या भागीदारीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची संसाधने आणि प्रबळ शैक्षणिक नेटवर्क उपलब्ध होणार आहे. हे एकत्रीकरण आमच्या शैक्षणिक प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे.” या भागीदारीच्या अंतर्गत ‘अरिहंत एज’ नावाचे अॅप देखील कार्मेल क्लासेसमध्ये लागू केले जाणार असून, विद्यार्थ्यांना यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स, डिजिटल मॉड्यूल्स आणि इतर तंत्रज्ञान-आधारित सुविधा मिळतील. या विस्तारासह अरिहंत अकॅडमी आता मुंबई आणि उपनगरांतील सर्वसमावेशक शैक्षणिक प्रदाता म्हणून अधिक मजबूत झाली आहे.