फोटो सौजन्य - सोशल मिडिया
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शतक झळकावून दिग्गजांच्या बरोबरी केली आहे. या मालिकेतील हे त्याचे दुसरे कसोटी शतक आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील ४१ वे कसोटी शतक आहे. यासह, जो रूट ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिकेत एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा चौथा इंग्लिश फलंदाज बनला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या शर्यतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचीही बरोबरी केली आहे.
रूट आता या यादीत संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याच्यापुढे फक्त ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखले जाणारे जॅक कॅलिस आणि सचिन तेंडुलकर उरले आहेत. जो रूटने १४६ चेंडूत त्याचे ४१ वे कसोटी शतक पूर्ण केले. इंग्लंडच्या २ बाद ५१ धावा असताना तो फलंदाजीला आला. त्याने उपकर्णधार हॅरी ब्रूकसोबत १६९ धावांची भागीदारी केली. रूटने त्याच्या डावात आधीच ११ चौकार मारले आहेत.
UP Warriorz ने नवीन कर्णधाराची केली घोषणा, दीप्ती शर्मा नाही तर या दिग्गज खेळाडूकडे संघाची कमान
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट आता सचिन तेंडुलकर आणि जॅक कॅलिस यांच्यानंतर संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. पॉन्टिंग आणि रूट यांच्याकडे आता प्रत्येकी ४१ शतके आहेत. रूट आता जॅक कॅलिस आणि नंतर सचिन तेंडुलकर यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करेल






