फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Cockroach Janata Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कॉकरोच जनता पार्टीची ’ (CJP) चर्चा सर्वत्र रंगली आहे.या संघटनेच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ज्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. या सगळ्या लोकांमध्ये या पार्टीचे प्रमुख चेहरे आणि प्रवक्ते यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. म्हणून आज आपण कॉकरोच जनता पार्टीचे तिन्ही प्रवक्ते आणि त्यांचे शिक्षण याबद्दल माहिती घेणार आहोत..
कॉकरोच जनता पार्टीचे शोधपत्रकार (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) सौरव दास यांना आपले मुख्य प्रवक्ते बनवले आहे. संघटनेच्या माहितीनुसार, त्यांनी अनेक वर्ष कायदेशीर न्यायिक आणि सामाजिक मुद्यांवर पत्रकारिता केली आहे. ते नोव्हेंबर २०२५ मध्ये इंडिया गेट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदूषण विरोधी आंदोलनाशी जोडले होते.
त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास, सौरव दास यांनी अमिटी युनिव्हर्सिटीमधून पत्रकारिता आणि जनसंवाद (Bachelor of Arts in Journalism and Mass Communication) यामध्ये पदवी ग्रेज्युएशन पूर्ण केले आहे. त्यांनी २०१६ ते २०१९ या कालवधीत हा कोर्स पूर्ण केला.
कॉकरोच जनता पार्टीचे दुसरे प्रवक्ते विजेता दहिया हे आहेत. संघटना त्यांची ओळख राजकीय संशोधक, लेखक, चित्रपट निर्माते आणि कंटेंट क्रिएटर म्हणून करून देते, मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘Power of Universe’ आणि ‘To Hell With That Job’ नावाची पुस्तके लिहीली होती. याशिवाय त्यांनी दरारे आणि ओपरी पराई या हरियाणवी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. विजेता दहीया हे मूळचे हरियाणाचे असून त्यानी स्वत:चे शिक्षण दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राउंड असण्यासोबतच ते लेखन, संशोधन आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही सक्रिय आहेत.
कॉकरोच जनता पार्टीचे तिसरे प्रवक्ते आशुतोष रांका हे आहेत. संघटनेनुसार, त्यांच्याकडे सल्लागार (कन्सल्टिंग) आणि जनहिताशी संबंधित मोहिमांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. आशुतोष यांनी शिक्षण हे देशातील सर्वोच्च संस्था आयआयटी कानपूरमधून पूर्ण केले आहे. इंजिनिअरिग पार्श्वभूमी असलेले आशुतोष ने ब्रिटनच्या नामांकित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स पदवी मिळवली. त्यांनी लंडनमध्ये मॅकिन्से अँड कंपनीसोबतही (McKinsey & Company) काम केले आहे.
CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी आयआयटीच्या सायबर टीममध्ये होणार सामील?






