फोटो सौजन्य: Freepik
जर तुम्हाला सुद्धा तुमच्या करियरची सुरुवात बँकिंग क्षेत्रात करायची आहे, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण इंडिया एक्झिम बँकेने मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती प्रक्रिया चालू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन माध्यमातून संबंधित पदासाठी अर्ज करू शकतात. eximbankindia.in ही या बँकेची अधिकृत वेबसाइट आहे.
रजिस्ट्रेशन प्रक्रिया 18 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येईल. अर्ज करण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर आहे, याची सर्व इच्छुक उम्मेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती अभियानाच्या अंतर्गत एक्झिम बँकेत 50 पदांसाठी भरती केली जाईल. लेखी परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर 2024 मध्ये केले जाईल. या पदांसाठीची परीक्षा आणि इंटरव्ह्यू मुंबई, कोलकाता, पुणे, नवी दिल्ली, त्रिची, हैद्राबाद, लखनऊ, वाराणसी आणि गुवाहाटीमध्ये भारावली जाईल.
हे देखील वाचा: भारतीय स्टेट बँकेत १,५११ पदांसाठी भरती सुरु; आजपासून करता येणार अर्ज
हे देखील वाचा: स्वीगीमध्ये सेल्स मॅनेजरच्या पदासाठी निघाली व्हॅकन्सी; इच्छुक उमेदवार करू शकतात अर्ज
उमेदवारांकडे बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये किमान 60% एकूण गुण असावे.
वयोमर्यादा – 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 21 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड प्रक्रिया लेखी परीक्षेवर आधारित असेल जी 100 गुणांची असेल. परीक्षेची वेळ 2 तास 30 मिनिटे आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीत उमेदवाराच्या एकूण कामगिरीच्या आधारे अंतिम यादी तयार केली जाईल. अंतिम यादी लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे (100 पैकी 70% वेटेजसह) आणि मुलाखतसह (100 पैकी 30% वेटेजसह) यशस्वी उमेदवारांची यादी तयार केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात येईल.
सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी रु.600 आणि SC/ST/PWBD/EWS आणि महिला उमेदवारांसाठी रु.100.
डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड आणि मोबाईल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते.