सौजन्य- iStock
तुम्ही 12 वी पास किंवा पदवीधर आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पूर्वोत्तर सीमा रेल्वे अंतर्गत लेखा लिपिक,अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट पदावर 117 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवाराने लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचे आहेत. कमीत कमी बारावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत हे अर्ज 20 जुलै 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक असेल.
पदे
शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 42 वर्ष असावे इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी हे वय 45 वर्षे तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारासाठी 47 वर्ष असेल. वयाचा पुरावा म्हणून दहावीचे प्रमाणपत्रावरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.
अर्जसंबंधी माहिती
20 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
परीक्षेची तारीख वेबसाईटवर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
आलेल्या उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षेनंतर निवड यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर इतर सर्व प्रक्रिया करून उमेदवाराची निवड केली जाईल.
परीक्षेमध्ये 120 प्रश्न विचारले जातील, ही परीक्षा 90 मिनिटासाठी असेल. परीक्षा पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ही माहिती तुम्ही जाहिरात डाऊनलोड करुन वाचू शकता.
मुळ जाहिरातीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://nfr.indianrailways.gov.in/cris//uploads/files/1718425638547-Notification%20for%20GDCE%2001-2024%20(1).pdf
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करायचा आहे.