फोटो सौजन्य - सोशल मीडिया
प्रियंका शुक्ला या उत्तर प्रदेशच्या रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. स्वत:च्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर २००६ मध्ये त्यांनी एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण पूर्ण केले आणि त्या डॉक्टर बनल्या.
डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना त्या एकदा झोपडपट्टी परिसरात गेल्या होत्या. तिथे त्यांनी पाहिले कि, एक महिला स्वत: अस्वच्छ पाणी पीत होती आणि आपल्या मुलांनाही तेच पाणी पाजत होती. प्रियंका यांनी जेव्हा तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती महिला म्हणाली की, “तू काय कुठली कलेक्टर आहेस का? जी मला शहाणपण शिकवतेस. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली त्याच क्षणी त्यांनी ठरवले कि, आता या टोमण्याचे उत्तर प्रशासकिय सेवेत जाऊनच द्यायचे.
नंतर त्यांनी डॉक्टरकी सोडली आणि पूर्ण लक्ष UPSC च्या तयारीवर केंद्रित केले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी उणिवांवर काम करत पुन्हा तयारी केली. २००९ मध्ये त्यांनी UPSC परीक्षेत ७३ वा रँक (Rank) मिळवून IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवा हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना राष्ट्रपती पदकांने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रियंका शुक्ला एक IAS अधिकारीच नाहीत तर त्या एक व्यवसायिक ‘कंटेम्परेरी डान्सर’ आहेत. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्या नृत्य, कविता आणि चित्रकलेची आवड जोपासतात. स्वत:च्या मोकळ्या वेळेत त्या आपल्या कलेला वाव देतात. त्यांची हीच खासियत त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.
Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? यांची शैक्षणिक योग्यता पहा आता एका क्लिकवर…






