फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अनिमेष प्रधान हे ओडिशाच्या तालचेर येथील रहिवासी त्यांनी एनआयटी राउरकेला येथून कॉम्पुटर सायन्स मध्ये बी टेक केले आहे. लहानपणापासूनच ते कष्टाळू आणि ध्येयाप्रती गंभीर होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले आशा प्रकारे नियतीने त्यांची लवकरच परीक्षा घ्यायला सुरवात केली. कमी वयातच कुटुंब, अभ्यास आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचे ओझे त्याच्या खांद्यावर आले. तरीही त्यांनी हिंमत न हारता अभ्यास सुरू ठेवला.
वडिलांनंतर त्यांच्या आईने कुटुंबाला आधार दिला. मात्र तिलाही कॅन्सरने ग्रासले. यावेळी तो यूपीएससीची अभ्यास करत होता. उपरचारादरम्यान काही काळातच आईचे निधन झाले आणि त्याच्यावर आणखी एक दु: खाचा डोंगर कोसळला पण त्यावेळी ही तो अभ्यास करतच होता.
अखेर त्याच्या मेहनतीला यश आले आणि २०२३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्याने यूपीएससीच्या परीक्षेत देशात दुसरी रँक (AIR 2) मिळवली. या यशापाठीमागे एक मोठी वेदना होती कारण त्याच्या आईचे स्वप्न होते की, मुलाने अधिकारी बनावे संघर्षातून स्वप्ने पूर्ण करता येतात. याचे एक उत्तम उदाहरण अमिष प्रधान आहे.






