फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Indian Navy B.Tech Entry 2026: भारतीय नौसेना (Indian Navy) भरती २०२६ अंतर्गत जानेवारी २०२७ बॅचसाठी ‘१२ वी बी.टेक कॅडेट एन्ट्री स्कीम’ (12th B.Tech Cadet Entry Scheme) अधिसूचना जाहीर केली आहे. या अंतर्गत एकूण ६० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीसाठी १२ वी उत्तीर्ण पात्र उमेद्वार २९ मे पासून अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
भारतीय नौसेनेने जाहीर केलेल्या भरतीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनीकेशन इंजिनिअरिंग (Electronics & Communication Engineering) या दोन्ही शाखांसाठी समान पदे विभागली आहेत. या योजनेअंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिला उमेद्वार, ज्यांनी जेईई मेन परीक्षा दिली आहे आणि १२ वी मध्ये निश्चित केलेले गुण मिळवले आहेत. तेच अर्ज करू शकतात.
HSC Marksheet Distribution: बोर्डाचा मोठा निर्णय! बारावीची ओरिजिनल मार्कशीट ‘या’ तारखेला मिळणार..
पात्रता: भारतीय नौसेना भरतीसाठी केवळ अविवाहित पुरुष आणि महिला उमेद्वारच अर्ज करू शकतात. उमेद्वारांनी जेईई मेन परीक्षा आणि १२ वी मध्ये विहित गुण मिळवणे अनिवार्य आहे.
शैक्षणिक अर्हता : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेद्वारांना १२ वी मध्ये भौतिकशात्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Mathematics) म्हणजेच PCM विषयांमध्ये किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक आहे. यासोबतच इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. तसेच उमेद्वाराने ‘जेईई मेन २०२६’ (JEE Main 2026) परीक्षेत बसला असावा. एसएसबी मुलाखतीसाठी उमेद्वारांची निवड ही जेईई मेनच्या ऑल इंडिया रँकच्या (All India Rank) आधारे केली जाईल.
निवड प्रक्रिया : एसएसबी मुलाखतीनंतर निवडलेल्या उमेद्वारांना निश्चित केलेली वैद्यकीय चाचणी (Medical Test) उत्तीर्ण करावी लागेल. जर एखादा उमेदवार आधीच एनडीए (NDA) किंवा आयएनए (INA) साठी वैद्यकीय चाचणी देऊन उत्तीर्ण झाला असेल तर त्याला पुन्हा वैद्यकीय तपासणी करावी लागणार नाही.






