फोटो सौजन्य - Social Media
लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) ने 2025 साठी नर्सिंग ऑफिसर म्हणजेच सिस्टर ग्रेड-II पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. अर्ज प्रक्रिया 25 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.kgmu.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरतीद्वारे एकूण 733 पदे भरली जाणार असून त्यामध्ये 107 पदे बॅकलॉग अंतर्गत आणि 626 पदे सामान्य भरती अंतर्गत आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित लेखी परीक्षेद्वारे (CRT) केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ₹44,900 ते ₹1,42,400 पर्यंतचा मासिक पगार मिळणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून B.Sc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक B.Sc नर्सिंग पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र त्यांच्याकडे किमान 50 खाटांचे रुग्णालयात दोन वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम KGMU च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Nursing Officer Recruitment 2025’ या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी करून लॉगिन माहिती प्राप्त करावी. फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करावीत. नंतर संबंधित श्रेणीनुसार शुल्क भरावे. सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएससाठी ₹2,360 तर अनुसूचित जाती-जमातीसाठी ₹1,416 शुल्क आहे. त्यानंतर अर्ज सादर करून त्याची छायांकित प्रत सुरक्षित ठेवावी.
चयन प्रक्रियेअंतर्गत 100 बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी दिला जाईल. यानंतर पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी केली जाईल. ही भरती नर्सिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह लवकर अर्ज करून ही संधी साधावी.