फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग तसेच फायनान्स क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेक संध्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या संध्यांच्या माध्यमातून उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील या रिक्त जागांसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या क्षेत्रातील त्यांच्या करिअरला गती देता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, कोणकोणत्या बँकेत भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बँकेत ३५० जागा रिक्त आहेत. संपूर्ण भारतभरात ही भरती सुरु करण्यात आली आहे. ३ मार्च २०२५ पासून या भरतीला सुरु करण्यात आली आहे. तर २४ मार्च २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी pnbindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावे. स्पेशिअल ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत ५१ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. १ मार्च ते २१ मार्च दरम्यान उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. Circle Based Executive (CBE) या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचना जाहीर आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी तसेच अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ippbonline.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडियाने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजच्या पदासाठी भरतीला सुरुवात केली आहे. एकूण ६५० रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी www.idbibank.in या संकेतस्थळाला भेट द्या. १ मार्च ते १२ मार्च दरम्यान उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
१ फेब्रुवारी पासून ३ मार्चपर्यंत घेण्यात आलेली भरती स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे असून अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी Bank.sbi या संकेतस्थळाला भेट द्या. मॅनेजर तसेच Dy. Maneger पदांना भरण्यासाठी ही भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ जागा रिक्त आहेत.
अप्रेन्टिस पदासाठी इच्छुक उमेदवारांनी युनिअन बँकेच्या या भरतीवर लक्ष द्यावे. या भरतीच्या माध्यमातून 2,691 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ५ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.unionbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. संपूर्ण भारतभरात ही भरती आयोजित करण्यात आली आहे.