फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)ने भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ७५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अप्रेंटिसच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरात ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग या भरती विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात:
IOB ने आयोजित केलेली ही भरती अत्यंत कमी कालावधीसाठी खुली करण्यात येणार आहे. अगदी ९ दिवसांमध्ये ही भरती समाप्त होणार आहे. उमेदवारांना १ मार्च २०२५ पासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर ९ मार्च २०२५ पर्यंत भरती सुरु असणार आहे. अशामध्ये उमेदवारांनी एक बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे. १ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ दरम्यान उमेदवारांना अर्ज शुल्क भरता येणार आहे. तर लगेच या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही ऑनलाईन परीक्षा १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
अर्ज शुल्काबद्दल महत्वाची माहिती पाहिली तर PwBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी रक्कम ४०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क करता येणार आहे. तसेच महिला उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क करता येणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये रक्कम भरायची आहे. प्रत्येक रक्कमेवर GST आकारण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही निकष पात्र करावे लागणार आहे. हे निकष शैक्षणिक आहे तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संबंधित आहेत. या भरतीसाठी किमान वय २० वर्षे निश्चित करण्यात आले आहे तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अप्रेंटिस भरतीसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल. प्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये सामान्य आणि वित्तीय जागरूकता (25 गुण), इंग्रजी भाषा (25 गुण), संख्यात्मक व तर्कशक्ती क्षमता (25 गुण) आणि संगणक ज्ञान (25 गुण) या चार विभागांचा समावेश असेल. एकूण 100 गुणांसाठी ही परीक्षा 90 मिनिटे चालेल.
दुसऱ्या टप्प्यात स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल, जिथे उमेदवारांना अर्ज केलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेमध्ये वाचन, लेखन आणि संभाषण करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र, जे उमेदवार दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषा शिकले आहेत, त्यांना या चाचणीतून सूट दिली जाईल.