फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून (MSBSHSE) दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर लगेचच लागणार असल्याचे सांगितले जात आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल लगेचच १० ते १२ दिवसात म्हणजेच दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात कधीही लागू शकतो.
सध्या दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे. लवकरच ही तपासणी पूर्ण होऊन लगेचच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होऊ शकतो. तुम्ही दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकता. यासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल चेक करा.
या नंतर होमपेजवर लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा बैठक क्रमांक (SEAT NUMBER) आणि आईचे नाव (MOTHER NAME) टाकून माहिती भरा.त्यानंतर (VIEW RESULT) या बटनावर क्लिक करा.
यानंतर तुमचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल याची तुम्ही प्रिंट (PRINT) घेऊ शकता.
याचसोबतच डिजिलॉकरवरदेखील तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.






