फोटो सौजन्य - Social Media
चंद्रपूर जिल्ह्यातील काही आकडे समोर आले आहेत. जिल्ह्यात एकूण ४५१ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामध्ये साक्षरतेचे प्रमाणही अधिक आहे. संपूर्ण जिल्ह्यातून फक्त ३ उमेदवार असे आहेत जे अशिक्षित आहेत. उर्वरित उमेदवारांचे शिक्षण झाले आहे. बरेच उच्चशिक्षित आहेत तर अनेक दहावी पास-नापास किंवा बारावी पास किंवा नापास आहेत.
आकडा पाहिला, यात एकूण ८ असे उमेदवार आहेत, जे वकिली पेशातून येतात. तर एक उमेदवार स्वतः एक डॉक्टर आहेत. एका Phd उमेदवाराचाही यामध्ये समावेश आहे. तर २२ उमेदवार इंजिनिअर आहेत. त्यामुळे या उच्चशिक्षित उमेदवारांकडून जनतेला फार आशा आहे आणि अपेक्षा आहे. तसेच तरुणांच्या इच्छेप्रमाणे उमेदवार आहेत. तर एकूण ४७ उमेदवार नववी पास आहेत.
विकासकामे करण्यासाठी जरी शिक्षण महत्वाचे नसले तरी व्यवस्थापन कौशल्य घडवण्यात शिक्षणाचे फार मोठे योगदान असते. पण काही राजकारणी अशीही आहेत, ज्यांनी अशिक्षित असूनही राजकारणात अनेक विकासकामे केली आहेत, जे अगदी शिक्षित राजकारणांनाही मागे टाकतात. शेवटी, जनसेवा हा इच्छेचा विषय आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महापालिका हद्दीतील एकोरी प्रभाग क्रमांक १०, इंडस्ट्रिअल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ तसेच भानापेठ प्रभाग क्रमांक ११ या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशिक्षित आहे.






