(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी ६ चे पर्व सुरू होऊन ४ दिवस झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कमालीची खळबळ माजली आहे. घरामध्ये एक मोठी ‘चोरी’ झाल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे घरातील सर्व स्पर्धक अवाक झाले आहेत. या चोरीमागे नेमका कोणाचा हात आहे, यावरून आता घरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, घरातील सदस्य या चोरीबद्दल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काही स्पर्धक याला ‘वृत्ती’ म्हणत आहेत, तर काही जण त्या व्यक्तीला उघड पाडण्याची मागणी करत आहेत. “घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की तो माणूस कोण आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या चोरीच्या प्रकरणामुळे घरातील समीकरणे बदलणार का? आणि बिग बॉस यावर काय शिक्षा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या ‘चोरीचा मामला’ नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.
‘बिग बॉस’ च्या नव्या सीझनमध्ये प्रभु शेळके उर्फ डॉन, अनुश्री माने, राकेश बापट, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद,, सागर कारंडे, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, रुचिता जामदार आणि करण सोनावणे हे सगळे स्पर्धक बिग बॉसच्या नव्या भागात दिसत आहेत.






