फोटो सौजन्य - Social Media
या भरती प्रक्रियेत विविध विभागांतील स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांचा समावेश असून, प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे ते कमाल 42 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्यांनी आपल्या पात्रतेची नीट तपासणी करूनच अर्ज करावा, असे SBIने स्पष्ट केले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेवर नोंदणी पूर्ण करणे हितावह ठरेल.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. General / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांना एकूण ₹750 रुपये भरावे लागणार आहे. SC / ST / PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:






