२४ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात? 'नीट' परीक्षेपूर्वी पालकांनी उपस्थित केले यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न..../फोटो सौजन्य - सोशल मीडिया
यंदा होणाऱ्या NEET UG 2026 परिक्षेला 24 लाख विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. सध्या विद्यार्थी परिक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. या दरम्यानच परिक्षेच्या प्रश्नासोबत केंद्रावर होणाऱ्या बायोमॅट्रीक (Biometric) पडताळणीबाबतही विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे बायोमेट्रीक जुळले नाही तर विद्यार्थ्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये काही ठिकाणी फिंगरप्रिंट न जुळल्याने, लाईट गेल्या आणि परिक्षा उशीर झाल्याने अनेत विद्यार्थी अडचणीत आले. यामुळे विद्यार्थांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला होता. यामुळे यंदाही त्यांच्यात भितीचे वातावरण आहे. पालकांनी देखील परिक्षाकेद्रांवर कोणतीही अडचण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या आई-वडीलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालक पालक परिक्षा यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आहे. दुसरकीडे परिक्षा विभागानेही विश्वास व्यक्त केला आहे की, परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी, जे कोणत्याही विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही. याकरिता परिक्षा विभाग खबरदारी घेत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष याकडे लगले आहे की परीक्षेच्या दिवशी सर्व प्रक्रिया विनाअडथळा पार पडेल की नाही.






