फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दरवर्षी अनेक विद्यार्थी काही क्षुल्लक चुकांमुळे परीक्षा केंद्रावरच रोखले जातात. अशा परिस्थितीत परिक्षेच्या दिवशी कोणतीही समस्या येऊ नये म्हणून सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत हे एनटीएचे नियम ..
परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी सर्व उमेद्वारांची कडक तपासणी केली जाते. कोणतीही इलेक्ट्रॉनिक किंवा धातूची वस्तू आत जाणार नाही. याची खात्री मेटल डिटेक्टरद्वारे केली जाते तसेच यावेळी ड्रेस कोड अंतर्गत विद्यार्थ्यांना फिकट रंगाचे आणि साधे कपडे घालण्याची सूचना दिली आहे.
या परिक्षेला अर्ध्या बाह्यांचे (Half Sleeves) कपडे सर्वात सुरक्षित मानले जातात. त्यामुळे उमेद्वारांनी फुल स्लीव्हज, मोठी बटणे, जास्त खिसे किंवा डिजायन असलेले कपडे टाळावेत. तसेच जाड सोलचे बूट किंवा हाय हील्स घालून येण्यस परवानगी नसणार आहे. उमेद्वारांना साधे चप्पल किंवा सँडल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रात धातूंच्या वस्तूंबरोबरच दागिन्यांवर बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चेन, अंगठी, बांगड्या, कानातले किंवा इतर फॅशनच्या वस्तू घालून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी मोबाईल, घड्याळ, बॅग, बेल्ट किंवा इतर इलेक्ट्रोनिक वस्तू घेऊन जाऊ नये. तसेच धार्मिक मान्यतेनुसार कडा, कृपाण, धागा किंवा हिजाब घालणाऱ्या उमेद्वारांना परीक्षाकेंद्रावर किमान ठरावीक वेळेच्या दोन तास लवकर पोहचावे लागेल. जेणेकरून त्यांची तपासणी केली जाऊ शकेल.
१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?
NEET UG परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र (Admit Card), पासपोर्ट साइज फोटो आणि वैध ओळखपत्र सोबत ठेवणे सक्तीचे आहे. तसेच वरील सर्व नियमांचे पालन केल्यास परीक्षेचा अनुभव उत्तम आणि तणावमुक्त राहील.






