फोटो सौजन्य - सोशल मीडिया
राजस्थान आणि उत्तराखंडमधून नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अशी माहिती मिळाली आहे कि, परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांमध्ये एक सॅम्पल पेपर (गेस पेपर) वाटण्यात आला. ज्यातील ३०० प्रश्नांपैकी १४० प्रश्न मुख्य परीक्षेशी मिळतेजुळते होते.
या प्रकरणाचा (NTA) ने तपास केला असून या तपासादरम्यान असे दिसले की, हा सॅम्पल पेपर केरळमधून राजस्थानमधील सीकर येथे आणण्यात आला होता. तसेच नंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थी आणि पालकांकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना खात्रीशीर पेपर देण्याचा दावा केला होता. मात्र अजूनही अधिकृतरीत्या पेपर फुटला होता की जुन्या पॅटर्नवर आधारित गेस पेपर होता हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
या मुद्द्यावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आपले स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा पूर्ण सुरक्षित वातावरणात पार पडली आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षांवर पोहचण्यापूर्वी पूर्ण तपासाची वाट पाहणे सोयीस्कर राहील. आता लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष तपास यंत्रणांच्या अहवालावर लागून राहिले आहे. जर तपासात हे आरोप खरे ठरले तर हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित मोठा मुद्दा बनू शकतो.






