फोटो सौजन्य - सोशल मीडिया
लखनौचे रहिवासी असलेले ७० वर्षीय अशोक बहार यांनी नीट परीक्षेला बसून शिक्षणाला वयोमर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे. वैद्यकीय क्षेत्राचे सखोल ज्ञान असणारे अशोक बहर सांगतात कि, त्यांनी त्यांच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी, औपचारिक पदवी मिळवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा आहे. त्यांची पत्नी स्त्रीरोगतज्ञ आहे, तर त्यांचे नातेवाईकही डॉक्टर आहेत. ज्यांनी त्यांना हे ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा दिली.
लखनौमध्ये NEET-UG 2026 परीक्षा अत्यंत कडक सुरक्षेत पार पडली. शहरातील ७६ केंद्रांवर अंदाजे ३७,१७६ उमेद्वार परीक्षेला बसले होते. उमेद्वारांना कडक तपासणी आणि बायोमेट्रीक पडताळणीनंतर परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला जात होता. देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ही परीक्षा २ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात आली.
बीकेटी केंद्राजवळ घडली एक हृद्यद्रावक घटना
या परीक्षेदरम्यान बीकेटी (बक्षी का तलाब) केंद्राजवळ एक हृद्यद्रावक घटना घडली. लखनौच्या औरैया जिल्ह्यातील ४६ वर्षीय अरूण कुमार, यांचा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला. याचा मुलगा नीटची परीक्षा देत असताना हा अपघात घडला असून पोलिसांनी त्याच्याजवळ सापडलेल्या आधार कार्ड आणि मोबाईल फोनच्या आधारे ओळख पटवून त्यांच्या अपघाताची कुटुंबीयांना माहिती दिली.






