Electric Car Tips : EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इलेक्ट्रिक कारची बॅटरी जेव्हा कमी होते त्यावेळी कारचे सॉफ्टवेअर ड्रायव्हरला सतर्क करते. कारमधील स्क्रीनवर लो बॅटरीचा मेसेज येतो किंवा कार बीपचा साऊंड देते. अनेक आधुनिक गाड्या आसपास चार्जिंग स्टेशनचा नकाशाही स्क्रीनवर दाखवतात. याशिवाय कारचे काही फिचर्स बॅटरी कमी होऊ लागल्यावर आपली उर्जा वाचवण्यासाठी काही फिचर्स आपोआप बंद करतात.
अशा वेळी हे टर्टल मोड अत्यंत उपयोगी ठरते. जेव्हा कारची बॅटरी अगदीच कमी झाली असेल तेव्हा कार टर्टल मोडमध्ये प्रवेश करते. या तंत्रज्ञानात स्क्रीनवर तुम्हाला कासवाचे चिन्ह दिसू लागले. ज्याप्रमाणे कासव संथ गतीने चालते, त्याचप्रमाणे तुमच्या कारचा वेग कमी होता. एक्सीलरेशन मर्यादा येतात ज्यामुळे उरलेली बॅटरी वापरुन तुम्ही सुरक्षित ठिकाणी किंवा कार चार्जिंग स्टेशनच्या जवळ पोहचू शकाल.
आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अनेकदा 0% रेंजवरही ईव्ही कार काही किलोमीटर अंतरापर्यंत धावू शकतात. ऑटो कंपन्यांनी बॅटरीमध्ये एक हिडन बफर तंत्रज्ञान अॅड केले आहे. या तंत्रज्ञानामुळे तुम्ही कार हवामान, रस्ते, आणि ड्रायव्हिंग स्टाईलनुसार साधारण ८ ते २४ किलोमीटर अंतरापर्यंत धावू शकते.
आता जर तुम्ही चार्जिंग स्टेशनवर पोहोचण्याआधीच ईव्हीची बॅटरी पूर्णपणे संपली तर कार हळूहळू थांबते. यामुळे कारला साखळीने बांधून नेणे धोकादायक ठरु शकते. अशी परिस्थितीत इलेक्ट्रिक मोटर खराब होऊ शकते. यामुळे फ्लॅटबेड ट्रक बोलावून कारला उचलून नेणे सुरक्षित ठरेल. यामुळे ईव्ही चालवताना बॅटरी १० टक्क्यांच्या खाली जाण्यापूर्वीच चार्जिंग करणे केव्हाही सुरक्षित ठरेल.






