फोटो सौजन्य - Social Media
पंजाब पोलीस विभागाने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता आले होते. अर्ज २१ फेब्रुवारी २०२५ ते १३ मार्च २०२५ पर्यंत करता आले होते. मोठ्या संख्यने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहे. मुळात, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून परीक्षेच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहून, परीक्षेला पात्र करणे अनिवार्य आहे. या परीक्षेच्या संदर्भात अधिकृत प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १७४६ रिक्त पदे भरण्यात येणार होते. चला तर मग या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार होते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना punjabpolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकष आखण्यात आले होते. हे निकष शैक्षणिक आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किमान १२ पास असणे आवश्यक होते. वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या निकषांनुसार, १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
पंजाब पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी उमेदवारांची निवड चार मुख्य टप्प्यांद्वारे केली जाईल. प्रथम, उमेदवारांना स्टेज I आणि स्टेज II अशा दोन टप्प्यांत लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर, शारीरिक चाचणी (Physical Test) घेतली जाईल. यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी (Document Verification) केली जाईल आणि शेवटी वैद्यकीय तपासणी (Medical Examination) होईल.
सर्वसाधारण प्रवर्गातील (Gen) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1200 निश्चित करण्यात आली होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिक दुर्बल घटक (SC/ST/EWS) प्रवर्गासाठी शुल्क ₹700 असून माजी सैनिक (ESM) उमेदवारांसाठी ₹५०० होती. अर्ज शुल्क केवळ ऑनलाईन माध्यमातून भरायचे होते.