काय घडलं नेमकं?
घडलेली घटना कर्नाटकातल्या तुमकुरु तालुक्यातील हेब्बूर होबली येथील दसराहल्ली गावात घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव परमेश असा आहे. ३० जानेवारी रोजी अचानक परमेशचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी अशा हिने सर्वांना सांगितले की, परमेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संशयाला जागा न ठेवता घाईघाईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बहिणीला मृत्यू खटकला आणि…
परमेश यांच्या मृत्यूला २० दिवस उलटले होते फक्त आणि पत्नी आशा हिने तिचा मित्र चंद्रप्पा याच्याशी लग्न केलं. या घाईघाईत केलेल्या लग्नामुळे गावात आणि नातेवाईकांमध्ये चर्चेला उधाण आले. परमेश यांच्या बहिणींना हे प्रकरण खटकले. पतीच्या निधनानंतर इतक्या कमी वेळात दुसरे लग्न केले म्हणजेच यात डाळ पिवळी नसून काळी आहे असा संशय त्यांना आला आणि त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली.
परमेश यांच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हेब्बूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परमेश यांचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला. त्यांनतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अहवाल येताच संशयाची सुई पत्नी आशा आणि तिचा नवीन पती चंद्रप्पा यांच्याकडे वळली.
पोलीस खाक्या दाखवताच गुन्हा कबूल
त्यांनतर पोलिसांनी आशा आणि चंद्रप्पा यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आशा आणि चंद्रप्पा यांनी आपला गुन्हा कबूल केला. आशा आणि
चंद्रप्पा यांचे प्रेमसंबंध होते, ज्यामध्ये परमेश हा अडथळा ठरत होता. घटनेच्या रात्री या दोघांनी मिळून झोपेत असलेल्या परमेश यांचे उशीने तोंड दाबले आणि त्यांचा श्वास गुदमरवून खून केला. हत्या केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) असल्याचे भासवले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पोलिसांनी दोघांना अटक केलं असून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.
Ans: कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील दसराहल्ली गावात ही घटना घडली.
Ans: पत्नीने 20 दिवसांत प्रियकराशी लग्न केल्याने संशय आला आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला.
Ans: पोलिसांनी काय कारवाई केली?






