(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो भारतीय नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये अडकले होते. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठी चिंता होती.. यातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार देखील कुवेतमध्ये अडकला होता. दहा दिवसांपूर्वी तो लंडनला जात होता मात्र मध्य पूर्वेतील तणावामुळे त्याचे विमान कुवेतमध्ये उतरले. तिथे तो हॉटेमध्येच राहत होता. आपल्या मुलाला सुखरूप मुंबईत परत आणण्यासाठी सुरेखा सुभेदारने सरकारकडे विनंती केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना आश्वासनही दिलं होते. अभिनेत्री विनंतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: विशाखा सुभेदार यांना फोन केला होता.
आज अखेर आठवड्याभराने अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत परतला आहे. त्यानंतर सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.
65 दिवसांपासून विवेक सांगळेचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद; अपील करूनही अभिनेत्याला मिळाला नाही प्रतिसाद
विशाखा, अभिनेय सुभेदाराने मानले सरकारचे आभार
मुलाला सुखरूप आल्याचे पाहिल्यानंतर विशाखा सुभेदार म्हणाली, माझा मुलगा एअर पोर्टला होता, तेव्हा हल्ला झाला. तो अडकल्याचे समजल्यावर आम्हाला ही धक्का बसला. पण आणि एकमेकांना दिलासा देत समजावत होतो. मात्र एक वेळ अशी आली की आम्ही पॅनिक झालो. दिवसरात्र सायरन वाजत होते ज्यामुळे भीतीचंच वातावरण होतं असं त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, ” आज 120 लोक परत आले आहेत. त्यापैकी 24 जणांचे व्हिसा अडकले होते. सरकारने सगळ्यांचं काम केलं आहे. सुभेदार यांनी सांगितले की, “मुलाला कसं आणता येईल यासाठी मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता आणि एकनाथ शिंदेंनी लगेच त्याची दखल घेतली. काही जण सांगत होते की Dubai मधून लगेच व्यवस्था होऊ शकते; मात्र Kuwait मधून ते अवघड आहे. कारण तिथली एअरस्पेस मिळत नव्हती. त्यामुळे मी अधिक चिंतेत होते.”
त्या पुढे म्हणाल्या, “पण सरकारने तात्काळ दखल घेतली आणि आवश्यक पावले उचलली. त्यामुळे माझा मुलगा सुखरूपपणे भारतात परत आला.”मुलगा सुरक्षित परतल्याने सुभेदार कुटुंबाने समाधान व्यक्त केले असून त्यांनी सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.






