फोटो सौजन्य - Social Media
द सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरती संबंधित महत्वाची अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण २६६ रिक्त पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचना २१ जानेवारी २०२५ जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेणे भाग आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या भरतीसंदर्भात संपूर्ण माहिती:
२१ जानेवारी २०२५ या तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करण्याची विंडो सुरु करण्यात आली आहे. तर ९ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मुळात, अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या centralbankofindia.co.in च्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. उमेदवारांची नियुक्ती परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. मार्च महिन्यात या परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. सर्व अर्ज कर्त्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचे आहे.
उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करताना जनरल प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांनादेखील सारखीच रक्कम भरायची आहे. तर SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर PWD प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर महिला उमेदवारांकडूनदेखील सारखी रक्कम आकारण्यात येणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहे. किमान २१ आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण २६६ रिक्त पदांना भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. तसेच अधिसूचनेमध्ये नमूद असणारे शैक्षणिक अटी शर्ती पाहता संबंधित क्षेत्रात पदवीधर असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. तर उमेदवारांकडे १ वर्षे ते ३ वर्षांचा अनुभव असणेही आवश्यक आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. तसेच संकेतस्थळाला जाऊन भेट द्यावी.