फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रेल्वे भरती बोर्डाने असिस्टेंट लोको पायलट भरती २०२६-२७ साठी संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार, १५ मे २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून १७ रेल्वे झोनमध्ये लोको पायलटच्या एकूण ११,१२७ पदांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक पदे ईस्ट कोस्ट रेल्वे (१,६२५), साउथ इस्टर्न रेल्वे (१,५३१) आणि सेंट्रल रेल्वेमध्ये (१,४००) आहेत. इच्छुक उमेद्वार त्यांच्या झोननुसार यासाठी अर्ज करू शकतात.
IIT Kharagpur: तुरुंगाच्या भिंतींआड कशी जन्मली अभियांत्रिकीची पंढरी? जाणून घ्या IIT खरगपूरचा इतिहास!
असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणारा उमेद्वार किमान १० वी उत्तीर्ण असण्यासोबत संबंधित ट्रेडमध्ये (फिटर, इलेक्ट्रिशियन, डिझेल, मेकॅनिक इ.) असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी असलेले उमेद्वारही या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच त्याचे वय १८ ते ३० वर्षादरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
प्रथम संगणक आधारित चाचणी (CBT 1) होईल.
त्यानंतर दुसरी संगणक आधारित चाचणी (CBT 2) घेतली जाईल.
तिसऱ्या क्रमांकावर संगणक आधारित (CBAT) टेस्ट असेल.
शेवटी कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) होईल.
इच्छुक उमेद्वार अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. तरी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.






