काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील तरुणीचे नाव स्वप्नाली घेवारी (वय २४) असे आहे. ती नवी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत होती. गेल्या ४ महिन्यांपासून ती वरळीच्या महालक्ष्मी सोसायटीत दोन मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होती. ती मूळची पुण्यातील खडकी पिंपळगावची रहिवासी तिच्या वडिलांना दारूची सवय होती. त्यांच्या या सवयीमुळे घरात सतत वाद होत होते. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून २६ एप्रिल रोजी स्वप्नालीची आई स्वाती या वरळी येथे राहण्यास आल्या. दोन दिवसांनी त्या बहिणीकडे गेल्या. दरम्यान, १ मे रोजी सुनील हे स्वप्नालीला सतत कॉल करून स्वातीबाबत विचारणा करू लागले. स्वप्नालीने आईला फोन करून वडिल त्रास देत असल्याचे सांगितले, तेव्हा आईने तिला मोबाईल बंद करण्याचा सल्ला दिला.
पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली
वडिलांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
रात्री ८ च्या सुमारास स्वप्नालीने आईला कॉल करून सांगितले की, माझी आता परीक्षा असल्याने मला कॉल करू नका, पप्पांना फोन करून त्यांच्याशी खूप भांडल्याचेही सांगितले. तर ९ च्या सुमारास स्वप्नालीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
वडिलांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून स्वप्नालीने आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केली. यांनतर तिचे वडील आपल्या पत्नीच्या माहेरी पोहोचेल आणि तिथे स्वप्नालीने व्हिडीओ करून आत्महत्या केल्याचे सांगून टाळ्या वाजवल्या. आता स्वप्नालीप्रमाणे आईचा काटा काढणार अशी धमकी दिल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी या घटनेची दखल घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी वडलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
पुण्यात ‘खाकी’ला डाग! गेल्या 7 वर्षात 333 पोलिसांचे निलंबन; तर ‘इतक्या’ जणांवर बडतर्फीची कारवाई
Ans: मृत विद्यार्थिनीचे नाव स्वप्नाली घेवारी होते.
Ans: ती नवी मुंबईतील NIFT मध्ये शिक्षण घेत होती.
Ans: या प्रकरणात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला






