फोटो सौजन्य- सोशल मीडिया
RRB Technician Recruitment : रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) 6 हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भरती बोर्डाकडून ग्रेड-1 आणि ग्रेड-3 च्या एकूण 6,565 पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून 2026 पासून सुरू होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन भरती 2026 साठी ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 10 वी, आयआयटी (ITI), डिप्लोमा आणि इंजिनीअरिंगची पदवी असलेले उमेद्वार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
रेल्वे भरती बोर्डाच्या माहितीनुसार, एकूण 6,565 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशियन ग्रेड-1 साठी 323 पदे रिक्त आहेत, तर टेक्निशियन ग्रेड -3 साठी 6,242 पदे रिक्त आहेत.
इच्छुक उमेद्वारांनी अधिकृत पोर्टल rrbapply.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 30 जून 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 29 जुलै 2026 असेल. रेल्वे भरती बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सर्व उमेद्वारांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या आधार कार्डावरील माहिती आणि 10 वीच्या निकालपत्रावरील तपशील व्यवस्थित तपासून घ्यावा. जेणेकरून कोणतीही चूक राहणार नाही.
टेक्निशियन ग्रेड-1: या पदासाठी उमेद्वाराकडे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, सायन्स, आयटी, बीएससी पदवी, बीई/बी.टेक पदवी किंवा संबंधित विषयातील 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन ग्रेड-3: या पदासाठी उमेद्वार 12 वी फिजिक्स आणि मॅथ्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा उमेद्वाराकडे 10 वी उत्तीर्णसोबतच NCVT/SCVT कडून मान्यताप्राप्त आयटीआय़(ITI) प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
रेल्वे बोर्डाच्या नियमांनुसार, या भरती प्रक्रियेसाठी वयाची गणना 1 जुलै 2026 या तारखेच्या आधारावर केली जाईल. टेक्निशियन ग्रेड-1 साठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष आणि टेक्निशियन ग्रेड-3 साठी 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
या भरतीसाठी सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेद्वारांना 500 रुपये आणि उमेद्वारांना एससी, एसटी, पीडब्ल्यूडी 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. आरआरबी टेक्निशियन भरतीसाठी उमेद्वारंची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT), कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणीच्या (Medical Test) आधारे केली जाईल.






