फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने गेल्या वर्षी भरतीच्या प्रक्रियेचा शुभारंभ केला होता. प्रोबेशनरी ऑफिसरच्या रिक्त पदांना भरण्यासाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. एकूण ६०० रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरती आयोजित केली गेली होती. मुळात, या भरतीमध्ये नियुक्तीसाठी उमेदवाराना परीक्षेला पात्र करावे लागणार आहे. या परीक्षेसंदर्भात अधिकृत प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना हे प्रवेशपत्र पाहता तसेच डाउनलोड करता येणार आहे. चला तर मग या भरती संदर्भात अधिक महत्वाच्या माहितीबद्दल जाणून घेऊयात:
27 डिसेंबर 2024 रोजी अर्जाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. तर उमेदवारांना १९ जानेवारी २०२५ पर्यंत भरतीची मुदत वाढवण्यात आली होती. या दरम्यान अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. ८ मार्च ते १५ मार्चदरम्यान प्रिलिम्स परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तर एप्रिल/मे २०२५ दरम्यान भरतीची प्रक्रिया घेण्यात येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागली होती. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या ऊमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये अर्ज शुल्क करावे लागले होते. तर OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखीच रक्कम निश्चित करण्यात आली होती. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार होते. तर PwBD उमेदवारानाही सारखीच सूट देण्यात आली होती.
SBI बँक PO भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष पात्रता असावी. अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात, मात्र त्यांना 31 जुलै 2024 पर्यंत पदवी पूर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयोमर्यादेच्या दृष्टीने उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 पर्यंत किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सवलत, तर इतर मागासवर्ग (OBC – नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत दिली जाईल. दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी 10 वर्षांची सवलत आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यात प्रारंभिक परीक्षा होईल, जी ऑनलाईन वस्तुनिष्ठ स्वरूपात असेल. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक अभियोग्यता आणि तर्कशक्ती क्षमता या विषयांचा समावेश असेल. या परीक्षेचा कालावधी 1 तास असून एकूण 100 गुणांची असेल. दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा घेतली जाईल, ज्यात तर्कशक्ती आणि संगणक अभियोग्यता, डेटा विश्लेषण व आकलन, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा असेल. याशिवाय, निबंध व पत्रलेखन कौशल्य तपासण्यासाठी वर्णनात्मक परीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षेसाठी एकूण 250 गुण असतील.
तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात गट चर्चा व मुलाखत (Group Discussion & Interview) घेतली जाईल, ज्यासाठी 50 गुण असतील. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.