फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 5.4 वाजल्यापासून सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून ०° कोनीय अंतरावर असतील, म्हणजेच या दोन्ही ग्रहांचा संयोग होईल. मंगळ आणि सूर्य ज्याला आदित्य म्हणूनही ओळखले जाते, यांच्या युतीमुळे मंगलादित्य योग तयार होणार आहे जो 2026 मधील पहिला मंगलादित्य योग आहे. या योगाचे विशेष महत्त्व आहे कारण नवीन वर्षात, ग्रह स्वामी सूर्य आणि ग्रह सेनापती मंगळ पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी मंगळ आणि सूर्य एकत्रितपणे योग तयार करतात तेव्हा ते शक्ती आणि धैर्याचे एक अतिशय शक्तिशाली संयोजन तयार करते. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते आणि तो निर्भय आणि स्वावलंबी बनतो. या योगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर व्यापक प्रमाणात पडतो. या योगामुळे आर्थिक लाभ आणि प्रलंबित कामे देखील पूर्ण होऊ शकतात. मंगलादित्य योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्साहाने भरलेला राहील. मंगलादित्य योगाचा प्रभावामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. तुम्हाला धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात. तसेच आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही आव्हानाला सहजपणे तोंड देऊ शकाल.
सिंह राशीच्या लोकांना मंगलादित्य योगाचा फायदा होणार आहे. या काळात सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि कोणत्याही जुन्या अडचणी किंवा अडथळ्या दूर होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये वाढतील. कुटुंबामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. तुम्ही ज्या काही योजना आखाल त्या यशस्वी होतील. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.
धनु राशीच्या लोकांना मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे मंगलादित्य योग नवीन सुरुवात आणि उत्साह आणेल. प्रलंबित कामे सहजपणे पूर्ण होतील आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. व्यवसाय किंवा नोकरीतमध्ये प्रगती होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आर्थिक लाभाच्या संधी तयार होतील. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जेव्हा सूर्य आणि मंगळ एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा तयार होणाऱ्या शुभ योगाला मंगलादित्य योग म्हणतात. हा योग पराक्रम, आत्मविश्वास, नेतृत्व आणि आर्थिक प्रगती वाढवणारा मानला जातो.
Ans: सूर्याच्या नेतृत्वशक्तीमुळे आणि मंगळाच्या उर्जेमुळे रखडलेली कामे पुन्हा गती घेतील, निर्णयक्षमता वाढेल आणि कामे पूर्ण होतील.
Ans: अती राग, अहंकार आणि घाईचे निर्णय टाळावेत. ऊर्जा योग्य दिशेने वापरणे महत्त्वाचे आहे.






