फोटो सौजन्य- सोशल मीडिया
How to Check SSC JE Result 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशनने ज्युनियर इंजिनियर परीक्षा २०२५ (SSC JE 2025) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. परीक्षा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले उमेदवार आता आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची यादी पीडीएफ स्वरूपात जारी करण्यात आली असून, यामध्ये उमेदवार आपला रोल नंबर किंवा नाव सर्च करून तपासू शकतात. आयोगाने एकूण १७३१ उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी तात्पुरते शॉर्टलिस्ट केले आहे.
एसएससीतर्फे ९ जुलै २०२६ रोजी ज्युनियर इंजिनियर परीक्षेसाठी फर्स्ट राउंड ऑफ टेंटेटिव्ह एलोकेशन जारी करण्यात आले होते. यानंतर सर्व शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी स्लाइडिंग आडेंटिटी व्हेरिफायेशन प्रक्रियेमध्ये सहभागी होणे अनिवार्य होते. ही प्रक्रिया २० आणि २१ जुलै २०२६ रोजी संबंधित एसएससी प्रादेशिक कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे.
आयोगानुसार, पद वाटप हे उमेदवारांनी ऑनलाइन दिलेली पद पसंती, मेरिट आणि स्लाइडिंग प्रक्रियेदरम्यान निवडलेल्या FIX आणि FLOAT पर्यायांच्या आधारावर करण्यात आले आहे. अंतिम निकालामध्ये एकूण १७३१ उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी प्रोविजनल शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
एसएससीतर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, स्लाइडिंग प्रक्रियेदरम्यान ५८५ उमेदवारांनी FIX पर्याय निवडला, तर १०२८ उमेदवारांनी FLOAT पर्याय निवडला. याशिवाय, स्लाइडिंग आणि आडेंटिटी व्हेरिफिकेशन प्रक्रियेला काही उमेदवार अनुपस्थित राहिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर ११५ नवीन आटंमेंट देखील करण्यात आले आहेत.
अंतिम निकालात एकूण १७३१ उमेदवारांची प्रोविजनल निवड झाली आहे. यामध्ये जनरल प्रवर्गातील ७८०, OBC चे ४३२, SC चे २७०, EWS चे १२७ आणि ST चे १२२ उमेदवार समाविष्ट आहेत. आयोगाच्या मते, रिपोर्ट केलेल्या सर्व रिक्त जागांसाठी प्रोविजनल शिफारसी जारी करण्यात आल्या आहेत.
एसएससी जेई निकाल तपासण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जावे.
त्यानंतर होम पेजवर दिलेल्या ‘Junior Engineer Examination 2025 Result’ या लिंकवर क्लिक करा.
आता निकालाची पीडीएफ (PDF) डाऊनलोड करा.
पीडीएफ उघडून Ctrl + F च्या मदतीने तुमचा रोल नंबर किंवा नाव सर्च करा.
जर यादीत तुमचे नाव असेल, तर तुम्ही पुढील टप्प्यासाठी निवडले गेला आहात असे समजावे.
अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर आता निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी आणि नियुक्ती प्रक्रिया संबंधित विभागांकडून पूर्ण केली जाईल. उमेदवारांना पुढील प्रक्रियेची माहिती संबंधित युजर डिपार्टमेंटकडून उपलब्ध करून दिली जाईल.






