फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UGC NET Result 2026 Update: जून २०२६ च्या यूजीसी नेट परीक्षमध्ये सहभागी झालेले लाखो परीक्षार्थी प्रोविजनल आन्सर-की ची प्रतीक्षा करत आहेत. परीक्षा संपून एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे, परंतु एनटीएने अद्याप आन्सर-की जाहीर करण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये निकाल, संभाव्य गुण आणि पीएचडी प्रवेश प्रक्रियेबाबत चिंता वाढताना दिसत आहे. मात्र, काही अहवालांनुसार परीक्षा निकाल लवकरच जाहीर केले जाण्यांची शक्यता आहे.
एनटीए यूजीसी नेट जून २०२६ परीक्षेचे आयोजन २२, २३, २४, २५, २९ आणि ३० जून रोजी करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांसाठी ५ जुलै रोजी पुन्हा परीक्षा देखील आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित मोडमध्ये ८७ विषयांसाठी घेण्यात आली होती. यूजीसी नेट परीक्षेच्या माध्यमातून ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठीची पात्रता आणि देशभरातील विद्यापीठांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी उमेदवारांची निवड केली जाते.
प्रोविजनल आन्सर-की जाहीर झाल्यावर एनटीए उमेदवारांची रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांची जुळवाजुळव करून संभाव्य गुणांचा अंदाज लावता येईल. जर कोणत्याही प्रश्नावर किंवा उत्तरावर आक्षेप घ्यायचा असेल, तर उमेदवार ठरवलेल्या मुदतीत ऑनलाइन आक्षेप नोंदवू शकतील. तसेच आन्सर-की वर आक्षेप नोंदवण्यासाठी प्रत्येक प्रश्नावर २०० रुपये नॉन-रिफंडेबल शुल्क भरावे लागेल.
उमेदवारांना त्यांच्या दाव्याच्या पुराव्यासाठी योग्य कागदपत्रे आणि तर्क देखील द्यावा लागेल. केवळ ठरवलेल्या वेळेत अधिकृत पोर्टलवर नोंदवलेल्या आक्षेपांवरच विचार केला जाईल. विषय तज्ज्ञ सर्व आक्षेपांचे पुनरावलोकन करतील आणि त्यानंतर अंतिम आन्सर-की जारी केली जाईल. यूजीसी नेट जून २०२६ चा निकाल याच अंतिम आन्सर-कीच्या आधारावर तयार केला जाईल.
आन्सर-की आणि निकालास होत असलेल्या उशिराबाबत अनेक विद्यार्थी सतत सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे की, अनेक विद्यापीठांनी पीएचडी प्रवेशाची अधिसूचना जारी केली आहे, परंतु यूजीसी नेटचा निकाल न आल्यामुळे त्यांना अर्ज प्रक्रियेमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी संघटनांनी देखील एनटीएला लवकरात लवकर आन्सर-की जारी करण्याची आणि निकालाची स्पष्ट कालमर्यादा जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी यूजीसी नेटमध्ये ८७ विषयांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ज्याच्या मूल्यमापनाची प्रक्रिया खूप मोठी आहे. तसेच अलीकडील महिन्यांमध्ये इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन आणि त्यांच्याशी संबंधित कामांमुळे देखील यूजीसी नेटची प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, एनटीएसोबत अजूनही आन्सर-की जारी करण्याची कोणतीही अधिकृत तारीख घोषित केलेली नाही.






