फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Nagpur Orange City: आपल्या देशातील अनेक शहरे त्यांच्या विशिष्ट ओळखीसाठी प्रसिद्ध आहेत. पण येथे एक सिटी अशी आहे, ज्याला लोक प्रेमाने ‘ऑरेंज सिटी’ (संत्र्यांचे शहर) या नावाने ओळखतात. येथे सर्वत्र संत्र्यांच्या बागा पहायला मिळतात. तसेच येथून दरवर्षी लाखो टन संत्री देशभरात पाठवली जातात. विषेश म्हणजे हे शहर केवळ चवदार संत्र्यांसाठी नाही तर शेती आणि व्यवसायासाठी ही ओळखले जाते. हिवाळ्यात इथल्या संत्र्यांच्या बागा सुगंधाने भरून जातात. चला तर मग जाणून घेऊया या ऑरेज सिटिबद्दल….
महाराष्ट्रातील नागपूर शहर संत्र्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे देशभरात सर्वाधिक संत्र्याची शेती केली जाते. त्यामुळे याला ‘ऑरेज सिटी’ म्हटले जाते. नागपूर आणि त्याच्या आसपासचा परिसर संत्र्याच्या शेतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. येथील माती आणि हवामान संत्र्यांच्या पिकासाठी उत्तम असल्याने येथे उत्पादित संत्र्यांची चव आणि गुणवत्ताचाही दर्जाही खास मानला जातो. नागपूरच्या संत्र्यांचे नाव देशभरात इतके प्रसिद्ध आहे की,याला ‘जीआय टॅग’ (GI Tag – भौगोलिक मानांकन) देखील मिळाला आहे.
नागपूरमधील हजारो शेतकरी संत्र्याच्या शेतीवर अवलंबून असून येथील शेती अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानली जाते. हिवाळ्यात येथील संत्र्यांचा व्यवसाय कोट्यावधी रुपयांवर पोहचतो. उत्पादन आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा करण्यासाठी येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. तसेच संत्र्यांमधून ‘व्हिटॅमिन-सी’ (Vitamin-C) देखील भरपूर प्रमाणात मिळत असल्याने बाजारात याची मागणी वाढत आहे, ज्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि निर्यातीच्या माध्यमातून चांगला नफा कमवत आहेत.
नागपूरची संत्री त्यांच्य पतळ सालीसाठी, रसाळ चवीसाठी आणि हलक्या गोडव्यासाठी ओळखली जातात. या संत्र्यांच्या खास वैशिष्ट्यामुळेच याला देशभरातच नव्हे तर परदेशातही मागणी आहे. दरवर्षी संत्र्यांच्या बागा पाहण्यासाठी मोठ्य़ा संख्येने पर्यटकही नागपूरला भेट देतात. त्यामुळे आता ‘ऑरेंज सिटी’ ची ओळख केवळ शेतीपुरती मर्यादित नसून ती या शहरांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ओळखीचा एक मोठा भाग बनली आहे.






