फोटो सौजन्य - Social Media
९ नोव्हेंबर रोजी टीईटी अनिवार्यता रद्द करण्यासाठी आणि संच मान्यतेच्या धोरणात बदल करण्यासाठी राज्यभर मुक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबरला दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित धोक्यात येऊ नये आणि त्यांना वेठीस धरले जाऊ नये, या कारणास्तव शाळा बंद आंदोलनाला समर्थन देणे योग्य नाही, अशी भूमिका संघटनेने जाहीर केली आहे.
मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असलेल्या कोणत्याही घटक संघटनेने ५ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. आंदोलनाबाबत कोणताही गैरसमज होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण अबाधित राहावे, म्हणून याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
जाधव यांनी सांगितले की टीईटी व इतर प्रलंबित मागण्या सुटण्यासाठी संघटना बांधिल असून येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ‘धरणे आंदोलन’ करून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान न होता प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेतूनच संघटना पुढील कृती आराखडा आखत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राज्यातील पहिली ते आठवी, एकंदरीत प्रार्थमिक शिक्षकांसाठी राज्य शासनाने महत्वाचा निणय जारी केला आहे. एकंदरीत, शिक्षकांना आता २०२७ पर्यंत TET परीक्षा पात्र करणे आवश्यक आहे. जर ते करू शकले नाही, तर त्यांच्या हाताची नोकरी ते गमावून बसतील. त्यामुळे शिक्षकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचे ठरवले आहे.






