पुण्यात शाळकरी मुलावर अत्याचार (फोटो- istockphoto)
तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अॅपचा पासवर्ड विसरला
पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय तरुणासोबत घडली. तेथील तीन महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून त्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता घडली. फिर्यादी तरुण एका इमारतीत गेला आणि तमन्ना शाहरुख मुलांना (वय ३२, रा. दत्तवाडी) हिच्याशी व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करायचे होते, मात्र पासवर्ड विसरल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून वाद झाला आणि मारहाण झाली.
Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण एका बुधवार पेठेतील इमारतीत गेला आणि तिथे तमन्नाशी बोलणी झाली. ठरल्याप्रमाणे पैशांचा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करायचा होता. मात्र, पेमेंट ऍपचा पासवर्ड आठवत नसल्यामुळे तरुणाकडून रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून तरुण आणि तमन्ना यांच्यात मोठा वाद सुरु झाला सुरुवातीला तमन्नाने शिवीगाळ केली. “पैसा नाही तर इकडे कशाला आलास?” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. नंतर तिच्या मदतीला तनुजा हकीमअली मौल्ला (वय ३४) आणि सोनिया गुलाम शेख (वय ३२, रा. बुधवार पेठ) या दोघी तिथे आल्या.